Jalna Politics: वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती; बुलढाण्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जालन्यात टाकला मोठा डाव

VBA And Thackeray Alliance In Jalna Politics: परतूर,अंबड आणि भोकरदन नगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती युती आघाड्या होताना पाहायला मिळत आहे. जालन्यातील परतुर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालीय.
VBA  And  Thackeray Alliance In Jalna Politics
Shiv Sena (Thackeray) and VBA leaders announce their alliance for the Paratur Municipal Election in Jalna.saam tv
Published On
Summary
  • परतूर,अंबड आणि भोकरदन नगरपालिकेची निवडणूक

  • परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती

  • परतूर शहरात वाढता कचरा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या

आकाश शिंदे-पाटील, साम प्रतिनिधी

बुलढाण्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आता जालन्यात नवा डाव टाकत नवी युतीची खेळी खेळली आहे. महायुतीनंतर वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलीय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित आघाडीनं कंबर कसलीय. महायुतीनं जेथे जमेल तेथे युती अन्यथा लढत असं धोरण ठरवलंय. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं युतीचं धोरण अवलंबत बुलढाणा आणि जालन्यात दोन पक्षांसोबत युती घडवून आणली.

VBA  And  Thackeray Alliance In Jalna Politics
Maharashtra Politics: नांदेडमध्ये मित्रपक्षाला अजितदादांचा दे धक्का; भाजप नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं साखील बुलढाण्यातील काँग्रेसशी हात मिळवणी केली. त्यानंतर दुपारी जालन्यात ठाकरे गटासोबत युती घडवून आणलीय, त्यामुळे इतर पक्षापेक्षा वंचित निवडणुकीच्या तयारीसाठी जोरात लागल्याचं दिसत आहे. एकाबाजुला सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल चढवलाय. या निवडणुकीत भाजपच आपलं टार्गेट असल्याचं त्यांनी आपल्या दोन रॅलीमधून जाहीर केलंय.

VBA  And  Thackeray Alliance In Jalna Politics
Maharashtra Politics: महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; राज्यातील राजकारणात नवीन पक्षाची एंट्री, शरद पवारांसह, महायुतीचं वाढलं टेन्शन

दरम्यान जालन्यातील परतुर,अंबड आणि भोकरदन नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती युती आघाड्या होताना पाहायला मिळत आहे. या जालन्यातील परतूर नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात आलीय. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत, सत्ताधाऱ्यांच्या मॅनेजमेंट राजकारणाला परतूर शहरातील जनता कंटाळली असल्याचं ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटलंय

परतूर शहरातील वाढता कचरा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या या सह तरुणांसाठी रोजगाराच्या प्रश्नासाठी आम्ही लढणार असून ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती

बुलढाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालीय. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झालेत. याआधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आलीय. दोन्ही पक्षाच्या जागावाटपानुसार वंचित बहुजन आघाडी बुलढाणा घाटावरील बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तसेच घाटाखालील खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com