Thackeray Group Saam Tv
मुंबई/पुणे

Vidhan Parishad Election: 'विधान परिषद निवडणूक स्थगित करा', ठाकरे गटाने का केली मागणी? VIDEO

Thackeray Group Likely To Approach Supreme Court To Stay Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेवरून ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत आहे. हे मतदान १२ जूलै रोजी होणार आहे. परंतु आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना ते मतदान कसे करू शकतात, असा आक्षेप ठाकरे गटाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

विधानपरिषदेच्या १२ जुलै रोजी ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता (Vidhan Parishad Election) आहे. आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं, हे घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

त्यामुळे विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून (Maharashtra Politics) आणणे, हे घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र जे सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामध्ये ते ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदे गटात गेलेत. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात (MLA Disqualification Case) आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात येणार आहे. या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

SCROLL FOR NEXT