Vidhan Parishad Election : राज ठाकरेंची मनसे विधानपरिषदेच्या मैदानात; कोकण विभाग पदवीधर जागेसाठी उमेदवाराची घोषणा

Vidhanparishad Election MNS Candidate : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. एकूण ४ मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेत एकही जागा न लढणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने विधान परिषद निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray Latest News
Maharashtra Politics: लोकसभेनंतर विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच! महायुती- मविआमध्ये इच्छुकांची गर्दी; ठाकरेंच्या 'सांगली पॅटर्न'ने डोकेदुखी वाढणार?

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेनं आपल्या अधिकृत X अकाउंटवरून परिपत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

"सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे", असं मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. इतकंच नाही तर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा देखील घेतली होती.

दरम्यान, लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधान परिषद निवडणुकीत मात्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभिजित पानसे यांची उमेदवारी मनसेची की महायुतीची, अस प्रश्न उपस्थित झाला आहे.

सध्या याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघातून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. यंदा त्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्याच जागेवर मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे.

विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसाठी ३१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. १० मे रोजी उमेदवाऱ्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून ही तारीख ठेवण्यात आली आहे. तर २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com