Sharad Pawar vs Ajit Pawar NCP Mla Disqualification Case Result Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवार की अजित पवार, कुणाचे आमदार ठरणार अपात्र? आज होणार महत्वपूर्ण फैसला

Sharad Pawar vs Ajit Pawar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (१५ फेब्रुवारी) दुपारनंतर निकालाचे वाचन करणार आहे. त्यामुळे शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

NCP Mla Disqualification Case Result

महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (१५ फेब्रुवारी) दुपारनंतर निकालाचे वाचन करणार आहे. त्यामुळे शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या.

या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीवेळी साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि दोन्ही गटांचा अंतिम युक्तीवाद ऐकून घेण्यात आला. ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनासाठी सुप्रीम कोर्टाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

मात्र, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यावर आक्षेप घेत केवळ एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी, असा युक्तिवाद केला. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

दरम्यान, ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर राहुल नार्वेकर आजच निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अजित पवार यांच्या गटाच्याच बाजूने लागणार, अशी कुजबूज सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT