Maharashtra Live News Update: पनवेलमध्ये प्रहार संघटना आक्रमक; विविध नागरी समस्यावरून उद्या ठिय्या आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, राष्ट्रवादीची बैठक, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

पनवेलमध्ये प्रहार संघटना आक्रमक, विविध नागरी समस्यावरून उद्या ठिय्या आंदोलन

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार आणि विविध सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी पालिका आयुक्त यांना निवेदन देत नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली होती होती. परंतु पालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने पालिकेला आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यात सार्वजनिक सुविधायुक्त रुग्णालय, सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करणे, आदिवासी वाघऱ्याचीवाडी इथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हवा प्रदूषण करणाऱ्या विकासकांवर कारवाई करणे, कंट्राटी कामगारांना सर्व सुविधा देणे, अनाधिकृत आणि बेकायदेशीर फेरीवाले यांच्यावर कारवाई करणे आदी मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, आदिवासी विकास परिषद आणि भीमशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरी प्रश्ना संदर्भात आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.

लातूरमध्ये विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या 

लातूरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात खळबळ, पॉलिटेक्निक मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा धारदार शस्त्राने भर रस्त्यात खून, 3 जन गंभीर जखमी.

मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही : सोमण

माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

 Central Railway : मध्य रेल्वेकडून होळीसाठी १८६ विशेष गाड्या

मध्य रेल्वेद्वारा १८६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यामध्ये ज्यामध्ये ९४ होळी विशेष आणि ९२ विशेष गाड्या असणार आहेत.

Manda Mhatre : गणेश नाईक यांना ठाकरे गटात घ्या; आमदार मंदा म्हात्रे यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पहिली गद्दारी गणेश नाईकांनी केली होती. त्याच गणेश नाईकांना संजय राऊत शिवसेनेत घ्यायला निघालेत. संजय राऊतांना माझी विनंती आहे.. गणेश नाईकांना तुम्ही शिवसेनेत घेऊनच जा.. बघा सत्तेशिवाय गणेश नाईक राहताहेत का, असं प्रत्युत्तर मंदा म्हात्रे यांनी संजय राऊतांना दिलं.

Mumbai : मुंबईत वाहतूक पोलिसांची ३६,१५३ वाहनांवर कारवाई 

मुंबई वाहतूक पोलिसांनी ४ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून ३६,१५३ वाहनांवर कारवाई केली आहे

Bhiwandi : भिवंडीत काँग्रेसचा महापौर होणार, माजी आमदार रशीद मोमीन यांचा दावा 

काँग्रेसचा दावा आगामी महापौर काँग्रेसचाच होणार आमच्याकडे 54 नगरसेवक असल्याचा दावा काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन यांनी केला आहे

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ठरणार?

Summary

राष्ट्रवादीची अध्यक्ष निवडीची तारीख ठरली. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ठरणार आहे

Kolhapur: कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

कोल्हापूर -

भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

एका व्यक्तीला बेशुद्ध होई पर्यंत मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती

कारखान्याच्या काही संचालकांमध्ये वाद झाल्याची माहिती

कारखान्यातल्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल

कारखान्यातील कार्यालयाच्या काचा फोडल्याची माहिती

Pune: पोलिस आयुक्त कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार

पोलीस आयुक्त कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्याची मागणी करणार

आयुक्तांच्या सांगण्यावरून आमची नावे FIR मध्ये टाकण्यात आली

महापौर यांच नाव तक्रारी मधून वगळलं

लवकरच आम्ही मोर्चा काढू

पुणे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पायी मोर्चा काढणार

लवकरच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पुण्यात येणार

Rohit Pawar: १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

पुणे -

१८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद

रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एक प्रेझेंटेशन दाखवलं जाणार

विमान अपघाताबाबत रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

१८ तारखेला सकाळी १० वाजता मुंबईत रोहित पवार साधणार माध्यमांशी संवाद

Solapur: सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गट नेतेपदी चरण चवरे यांची निवड

पंढरपूर -

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गट नेतेपदी चरण चवरे यांची निवड

एंकर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेते पदाची आज पंढरपुरात निवड करण्यात आली.

शिवसेनेचे गटनेतेपदी पेनुर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले चरण चवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी 37 जागांवर भाजपाचे तर आठ जागांवर शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत.

आज पंढरपुरात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

Pune : पुणे पोलिसांच्या विरोधात प्रशांत जगताप हायकोर्टात जाणार

पुणे पोलिसांच्या विरोधात प्रशांत जगताप हाय कोर्टात जाणार

पुणे पोलिसांनी जर परवानगी दिली नसतती तर हे आंदोलन झाल नसत

पुणे पोलिसांनी महापौर यांच नाव जाणून बुजून वगळलं आहे

पुणे पोलीस पक्षपाती पण करता आहे

प्रशांत जगताप यांचा आरोप

प्रशांत जगताप जाणार हाय कोर्टात

Pune: काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात देखील जाण्याची शक्यता

काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात देखील जाण्याची शक्यता

गुन्हा नोंद करून घ्यायला वेळ लावला

पोलिसांनी जाणून बुजून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला

काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांचा आरोप

Pune: काँग्रेस भवन परिसरात झालेल्या गोंधळानंतर आज काँग्रेस नेत्यांची बैठक

पुणे -

पुण्यात काँग्रेसची बैठक

कालच्या काँग्रेस भवन परिसरात झालेल्या गोंधळानंतर आज काँग्रेस नेत्यांची बैठक

पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक

काल झालेल्या आंदोलनादरम्यान झाली होती दगडफेक

काँग्रेसचे स्थानिक नेत्यांची कालच्या प्रकरणावर बैठक

जळगावच्या बाजारात सोने-चांदीत घसरण,सोने जीएसटीसह 1 लाख 60 हजार रुपयांवर

जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरत झाली आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रमाणपत्र वाटप प्रकरण,मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

वाटप केलेल्या अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या निर्णयावर स्थगिती येण्याची शक्यता

अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱ्यांची अंतरिम चौकशी होण्याची शक्यता

अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी, दुखवटा असताना देखील केले गेले होते शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप

400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

मुख्य आरोपींना पाठीशी घालत मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न - संदीप पाटील

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनात एकुण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या ८ गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे , सदाभाऊ खोत , निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २०१२ साली आम्ही ऊस आंदोलनात २७०० रूपये पहिली उचलीची मागणी केलेली होती. राज्यातील साखर कारखानदार कोणीच दर जाहीर केले नव्हते.

बीडच्या पाडळशिंगी येथील परिक्षा केंद्रावर काॅफ्याचा सुळसुळाट...!

बीडच्या गेवराई तालुक्यातील पांढरसिंगी येथे सध्या बारावीची परीक्षा चालू आहे दगडाला बांधून कॉफी टाकताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे एकीकडे जिल्हाधिकारी यांनी कॉपी मुक्त अभियान राबवले आहे प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत असं जिल्हाधिकारींनी सांगितलं मात्र याच ठिकाणी काही तरुण कॉफी देत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे प्रशासनाची वतीने या संदर्भात काय दखल घेतली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महिला भाजप पदाधिकाऱ्यांकडून बांगड्या फोडून आंदोलन

बीडमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेसमोर बांगड्या फोडून निषेध व्यक्त केला. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप करत हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे आंदोलकांनी म्हटले. तसेच समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे 3 दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार नाही, हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरेंची दातखीळ बसली आहे का? छत्रपतींचा अवमान होत असताना उद्धव ठाकरे यांनी निषेध का केला नाही असे परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान, थोडी जरी धमक शिल्लक असेल तर उबाठा गटाने हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करावे असे आव्हान बन यांनी दिले.

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पुणे पोलिसांनी राजस्थान येथे छापेमारी करत ४ कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी परिसरातून १२ लाख रुपयांचे २७ ग्रॅम एम डी हे अमली पदार्थ जप्त केले होते. पुणे पोलिसांनी या रॅकेट चा तपास करायला सुरुवात केली. यामध्ये काही जणांना अटक केली आणि थेट राजस्थान येथील जोधपूर पर्यंत त्यांचे धागेदोरे असल्याचं तपासातून समोर आलं. त्यानुसार पुणे पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथील जोधपूर येथे छापेमारी करत या रॅकेट चा म्होरक्या रामकरण जाट याला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी पुण्यात सुद्धा विविध ठिकाणाहून आरोपींना जेरबंद करत एकूण १ किलो ९६० ग्रॅम एम डी अमली पदार्थ जप्त करत एकूण ६ जणांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ या आरोपींनी किती जणांना विकले आहे आणि याची खरेदी करणारे कोण आहेत याचा तपास सुरू आहे.

ठाकरेंची शिवसेना 26 फेब्रुवारीला अकोल्यात रस्त्यावर उतरणार

अमेरिकेसोबत भारताने केलेल्या व्यापार करारावरून आता ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहेय. अकोल्यात ठाकरेंची शिवसेना 26 फेब्रुवारीला जिल्ह्यात 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेय. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीये. अमेरिकेसोबत केलेल्या वापर करारामुळे देशभरातील शेतमालाचे भाव पडल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केलाय. हिंदुत्वाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपला यासंदर्भात हिंदू शेतकऱ्यांच दुःख दिसत नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय. यासंदर्भात 26 फेब्रुवारीला संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणारेय.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक झालीय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन केले. यावेळी महिला भाजपा पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेसमोर बांगड्या फोडल्या. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची बरोबरी केली. यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून सपकाळ यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पिंपळे गुरव परिसरातील दोन गोदामाला लागली शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग

पिंपळे गुरव परिसरातील आजूबाजूला असलेल्या दोन गोदामाला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली आहे दुपारी बारा वाजता दरम्यान चंद्रभागा लॉन्स पाठीमागे असलेल्या दोन गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत गोदाम पूर्णपणे जळून खाक झाल आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली आहे. शॉर्ट सर्किट मुळे डेकोरेशन सामान आणि लाकडी प्लाऊडच्या गोदामाला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

अनुष्का पाटोळे हत्या प्रकरण;लातूरमध्ये महाआक्रोश मोर्चा.

लातूर मधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणी लातूरमध्ये आज महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापासून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला, अनुष्का पाटोळे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, यासह इतर मागण्यांसाठी हा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला , यावेळी मोठ्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते.

परभणी महानगरपालिका महापौरपदाचा सय्यद इकबाल यांनी स्वीकारला पदभार

परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सेनेचे ठाकरे सय्यद इकबाल आणि काँग्रेसचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज महापालिकेत जाऊन पदभार घेतला आहे. परभणी शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कसल्याही परिस्थितीत परभणीकर यना त्रास होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार निवडणुका झाल्या नंतर आम्ही परभणी शहरात स्वच्छतेची कामे सुरू केली आहेत पदभार घेण्यापूर्वीच आम्ही परभणी करांच्या सेवेत उतरला असून शहरातील प्रमुख कचऱ्याची समस्या असेल धुळीची समस्या असेल रस्ते नाली हे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी सांगितले

युवक काँग्रेस घेणार उपमुख्यमंत्री यांची भेट

अल्पसंख्यक विभागाकडून शैक्षणिक संस्थांना वाटलेल्या प्रमाणपत्रांबाबत, युवक काँग्रेस घेणार उपमुख्यमंत्री यांची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून देणार सगळ्या प्रकरणाची माहिती

शासकीय दुखवटा असताना प्रमाणपत्रांचे वाटप कसे केले, पुणे युवक काँग्रेसचा प्रश्न

अल्पसंख्यक विभागातील बडे अधिकाऱ्यांच्या बाबत सुनेत्रा पवार यांच्याकडे केली जाणार तक्रार

पुढील तीन ते चार दिवसात युवक काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना दिले जाणार निवेदन

एपीएमसी मार्केट मध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल

नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. या वर्षी हापूस आंब्याला अवकाळी पावूस आणि थंडीचा फटका बसल्याने आवक घटली आहे. गेल्या वर्षी या वेळेला ५०० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली होती. या वर्षी फक्त ८० ते १०० पेट्या येवू लागल्या आहेत. कोकणातील हापूस पेक्षा केरळच्या हापूस आंब्याची आवक जास्त आहे. साधारणपणे १४ हजार किलो केरळ हापूस येवू लागला आहे. कोकणातील हापूस आंबा २ ते २.५ हजार डझन ने विकला जातोय तर केरळ हापूस २०० ते ६०० रुपये किलोने विकला जातोय. अमेरिकेच्या निर्यात धोरणाचा फटका इतर कृर्षी मालाला बसला असला तरी हापूस आंब्याला मात्र फायदा होणार आहे. हापूस आंब्याला शून्य टक्के निर्यात शुल्क लावल्याने मोठ्या प्रमाणात अमेरिकेत हापूस जाणार आहे.

लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागातील वर्ग तीन व चार मधील कर्मचाऱ्यांचे आज पासून काम बंद आंदोलन सुरू झाले आहे, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ, पदोन्नती, जुनी पेन्शन योजना यासह इतर मागण्यासाठी जवळपास 500 हून अधिक कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभाग झाले आहेत. आज पासून असहकारित्या हे काम मतदान आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणारे शासकीय व नियम शासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत

गणेश नाईकांवर हल्लाबोल

कोल्हापूर महापालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ संपन्न 

कोल्हापूर महानगर पालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आपल्या पदाचा पदभार आज स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आमदार विनय कोरे यांनी महापौर दालनाची फीत कापून आणि श्रीफळ वाढवत आत प्रवेश केला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी नूतन महापौरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा पहिल्यांदाच महापौर झाल्याचा आनंद सर्वांना झाल्याच सांगत नगरसेवकांनी कस काम केलं पाहिजे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी देता येईल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे. दरम्यान भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी दिला आहे.

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरी

पंढरपूर येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरी मिळाली आहे. या कार्यालया अंतर्गत पंढरपूरसह सांगोला, माळशिरस, मंगळवेढा,माढा आणि करमाळा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.

अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्याने जिल्हा निर्मितीसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे,अशी प्रतिक्रिया आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

रेड्यांच्या टकरीत 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

रेड्यांच्या टकरी पाहण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय युवकाचा रेड्याची जबर धडक लागून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात ही घटना घडली. रेड्यांच्या टकरिवर बंदी असतानाही आलेगाव येथे एका मैदानात काल रेड्यांच्या टकरी भरवण्यात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमरास शेवटच्या टकरी दरम्यान एका रेड्याने खंडू झंपलवाड या युवकाला जोरात धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या खंडू झंपलवाड याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक

मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कारवाई

रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक

आरोपीसह आणखी तिघांना अटक

मोबाईल आणि आणखी काही गोष्टी जप्त

राजस्थानच्या बहादूर गड येथून केली चौघाना अटक

मुंबई क्राईम ब्रांच आणि बहादूरगड स्पेसिअल टास्क फोर्सची संयुक्त कारवाई

उल्हासनगरमध्ये व्याजखोरांची गुंडगिरी

उल्हासनगर मध्ये व्याजावर घेतलेले पैसे वेळेवर दिले नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे , चिराग मिरचंदानी असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

चिरागचे अपहरण करून त्याला अर्धनग्न करुन मारहाण करण्यात आली . त्यानंतर चिराग याच्या बहिणीने कसेबसे पैसे जमा करुन दिल्यावर त्याची सुटका करण्यात आली, या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकारणी उल्हासनगर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात केला गुन्हा दाखल पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेतीच्या वादातून शेतकर्याचा ऊस गाळपा अभावी शेतात पडून

शेतीच्या वादातून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील शेतकरी नंदकुमार उपासे यांचा चार एकरातील सुमारे 200 टन ऊस गाळपा अभावी शेतात उभा आहे.

पोलिसांनी संबंधित शेतकर्यांवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी पिडीत शेतकर्याने केली केली.

नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

- भारत पिंगळे या शेतकऱ्याच्या दारात येऊन बिबट्याने मांजरावर हल्ला करत केले जखमी

- हल्ल्याचा सर्व प्रकार घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद

- बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

- CCTV फुटेज च्या आधारे बिबट्याच्या शोध घेण्यासाठी स्थानिकांची पिंजरा लावण्याची मागणी

Nandurbar: नंदुरबारच्या पालकमंत्री अजूनही ठरेना...

नंदुरबार जिल्ह्यात दीड महिन्यापासून पालकमंत्री पद नसल्याने पालकमंत्री पद भाजपाला देण्यात यावा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची मागणी

पालकमंत्री पद नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यात अडचणी येणार आहे

जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार असल्याने पालकमंत्री भाजपाच्या दिल्यास विकासाला मोठी चालना मिळणार

शेजारील असलेल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात यावा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून नंदुरबार जिल्ह्याला भाजपाचे पालकमंत्री देण्याचे मागणी करणार

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बेकायदेशीरपणे शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी सुनावणी

बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप

सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ठरवले होते दोषी

न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत शिक्षेवर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात मिळवला होता अंतरीम जामीन

जामीनाची मुदत संपत असल्याने पुन्हा जामीन मिळावा यासाठी कोकाटे यांच्याकडून अर्ज

आज या अर्जावर केली जाणार सुनावणी

Mumbai News: जे. जे. रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आजपासून उपोषण

जे. जे. रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आजपासून उपोषण

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय

आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे २०० निवासी डॉक्टर सहभागी होतील

आणि टप्प्याटप्प्याने इतर डॉक्टरही यात सहभागी होणार

जिमखान्याची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे अधिकार जपण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे

Nashik: नाशिकमध्ये 400 कोटींच्या कथित लूटप्रकरणी सातही जण निर्दोष

400 कोटींच्या कथित लूट प्रकरणी सातही जण निर्दोष

फिर्यादीने केलेली तक्रार बनावट असल्याचे निष्पन्न

कर्नाटकातील चोरले घाटात एका 400 कोटी रुपये असलेल्या ट्रक ची चोरी झाल्याचा केला होता दावा

याप्रकरणी पोलिसांनी गुजरात मुंबई कल्याण येथून संशयतांना घेतल होता ताब्यात

प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी ची देखील केली होती स्थापना

घटनेत गंभीर विसंगती आढळल्याने न्यायाने केली संशयितांची निर्दोष मुक्तता

स्वतंत्र चौकशीची संशयितांच्या नातेवाईकांची मागणी

भाटपुरी-रताळे येथील ४९०७बनावट जन्म नोंदी अखेर रद्द

पारोळा तालुक्यातील रताळे आणि भाटपुरी येथील बनावट जन्म दाखल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी पावले उचलली आहेत. अस्तित्वात जिल्हा प्रशासनाने आता कठोर नसलेल्या 'भाटपुरी' या ओसाड गावाचा लॉगिन आयडी वापरून तयार करण्यात आलेले तब्बल ४९०७बनावट जन्म दाखले आँखैर रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या कालावधीत पारोळा तालुक्यातील रताळे ग्रामपंचायतीच्या नावाचा आणि भाटपुरी या ओसाड गावाच्या लॉगिन आयडीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर जन्म नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदी संशयास्पद वाटल्याने प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. तपासात या सर्व नोंदी पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. भाटपुरी येथील सर्व ४९०७ अवैध नोंदी टप्याटप्याने 'सीआरएस' पोर्टलवरून रद्द करण्यात आल्या आहेत.

सरकारने स्मारकासाठी ३०० कोटी रुपये सरकारने उपलब्ध करून द्यावे, चिपळूण साहित्य संमेलनात ठराव

चिपळूण तालुक्यातील पालवण इथं तीन दिवस चाललेल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या संमेलनात छत्रपती संभाजी महाराज्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा ठराव घेण्यात आला. त्यासाठी सरकारने स्मारकासाठी ३०० कोटी रुपये सरकारने उपलब्ध करून द्यावे असा देखिल ठराव करण्यात आला. तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी भुमिका यावेळी ठरावातून मांंडण्यात आली.

Bhandup: भांडुपमध्ये 23 वर्षीय तरुणाची हत्या

भांडुप मध्ये 23 वर्षीय तरुणाची धार धार शस्त्राने वार करून हत्या

भांडुप पूर्व येथे चामुंडा नगर मध्ये झालेल्या किरकोळ वादातून 23 वर्षीय तरुणाची भांडुप पूर्वकडील मेनन कॉलेज जवळ पहाटे दोनच्या दरम्यान घटना घडली

हर्षा ठाकूर नाहूरला राहत असून मित्रासोबत मेनन कॉलेज जवळ थांबला होता. तेव्हा आरोपी रोहित त्या ठिकाणी येऊन हर्षावर धार धार शस्त्राने वार करु लागला. त्यात हर्षा हा गंभीर रित्या जखमी होऊन हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टर त्यांना मयत घोषित केले.

Pahalgam: पहलगाम हल्ल्यातील कुटुंबियांना शासकीय सेवेत दाखल करुन घेण्यासाठी मेधा कुलकर्णींनी घेतली आमित शाह यांची भेट

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले पुण्यातील स्वर्गीय संतोष जगदाळे यांचे कुटुंब आजही त्या दुःखातून सावरत आहे. त्यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने जगदाळे आणि आसावरी काही दिवसांपूर्वी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली होती.

शासकीय सेवेसंदर्भात महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारने योग्य ते सूचित करावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली. आसावरीच्या भविष्याचा विषय त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतला आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

Bhandara: भंडाऱ्यात बिबट्याचं थरारक रेस्क्यू; वन कर्मचाऱ्यांनी केली कामगिरी

गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर बिबट्यानं थेट हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, वन कर्मचाऱ्यांना थेट त्यांचा मृत्यू समोर दिसत असतानाही वन कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळं एक मोठा अनर्थ टळला असून हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नान्होरी-दिघोरी शेतशिवारात घडला. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यानं शेतीची कामं प्रभावित झाली होती. वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात "फिल्डिंग" लावली होती. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं समोरून वेगानं अंगावर येत असताना वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखलं. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हातात असलेल्या बॅरिकेट्सचा ढाल म्हणून वापर केला. बिबट्या बॅरिकेट्सवर वार करत असतानाच, दुसऱ्या बाजूनं वन कर्मचाऱ्यांनं अचूक निशाणा साधत बिबट्याला 'डॉट' मारला. काही वेळातचं बिबट्या बेशुद्ध झाला आणि नंतर बिबट्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं.

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट

मंत्री नरहरी झिरवळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट

मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवळ सापडलेत अडचणीत

शनिवारी सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ आहेत नॉट रीचेबल

विरोधी पक्षातील नेत्यांनी केलीय झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी

Nagpur: नागपूर विमानतळावर सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद...

सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे...

प्रवाशांची सुरक्षा तपासणी काऊंटर परिसरात गर्दी...

मुंबई आणि दिल्लीला जाणारी विमानं वेळेवर असल्याने प्रवाशांना फटका

डीजी यात्रा सॅाफ्टवेअर सुद्धा बंद असल्यानं सीआयएसएफचे अधिकारी हे स्वता तिकीट आणि ओळखपत्र तपासून आत सोडत आहे...

त्यामुळे डिजी यात्रातून तिकीट काढूनही प्रवाश्यांना फटका बसत आहे, शिवाय वेळ अधिक लागत आहे...

Teacher: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई साठी उद्यापासून प्रवेश अर्ज भरता येणार

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई साठी उद्यापासून प्रवेश अर्ज भरता येणार

राज्यातील 8650 शाळात एक लाख 12 हजार जागा आरटीई अंतर्गत उपलब्ध

राज्यात सर्वाधिक जागा या पुणे जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या आहेत

प्रवेश निश्चित करताना खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहे

10 मार्च 2026 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे

Pune: राज्यातील पहिले ड्रोन क्लस्टर पुण्यात होणार

औद्योगिक क्षेत्राला नवे बळ देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात साकारला जाणार

ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यातील पहिले सामायिक सुविधा केंद्र पुण्यात सुरू करण्यासाठी एम सी सी आय ए ने घेतला पुढाकार

उद्योग विभागाकडे प्रस्ताव मंजूरसाठी पाठवला जाणार

ड्रोन क्लस्टर म्हणजे ड्रोन आणि त्याच्या सुट्या भागांसाठी आवश्यक असे आरेखन, संशोधन, चाचणी आणि संबंधित तंत्रज्ञानाशी निगडित उद्योगांना एकाच ठिकाणी उपलब्ध अशी सुविधा

ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व जागेचा खर्च वाचवून जास्तीतजास्त रक्कम यंत्रसामग्री व सॉफ्टवेअरमध्ये गुंतवता यावी यासाठी चेंबरच्या पिंपरी औद्योगिक वसाहतीमधील शाखेत हा प्रकल्प साकारणार आहे

संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील ड्रोनचा वाढता वापर लक्षात घेता य क्लस्टरमुळे राज्यातील ड्रोन क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार

Sangli: लेकीच्या जयंतीनिमित्त 102 मुलींच्या नावावर कन्यारत्न ठेव

सांगली मध्ये कन्या रत्न ठेव योजनेचा गोव्याचे क्रीडा मंत्री रमेश तवडकरांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.सांगलीतील रुद्राणी फाउंडेशनच्यावतीने समाजातील गरीब कुटुंबातील 102 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आले आहेत.रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंती निमित्ताने तिच्या नावे ही ठेव योजना सुरु केली असून गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते मुलीच्या नावे ठेवण्यात आलेली ठेव पावती संबंधित कुटुंबांना प्रदान करण्यात आली. आतापर्यंत रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून 702 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आल्या असून मुलीचा जन्मदर वाढावा,या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतुन रुद्राणी फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Congress: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

काँग्रेस भवन दगडफेक प्रकरणी भाजप-काँग्रेस शहराध्यक्षांसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने काँग्रेस भवनासमोर रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते

दगडफेकीच्या या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी तसेच, सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा चे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे ५० ते ६० भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गौरव बाळंदे, युवक काँग्रेसचे अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल

APMC Market: एपीएमसी फळ मार्केटमध्ये टरबुजाची (खरबूज) बंपर आवक

उन्हाळा सुरू होताच एपीएमसी फळ मार्केटमध्ये रसाळ फळांची मागणी वाढली आहे. विशेषतः खरबुजाच्या आवकमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एपीएमसी फळ मार्केटमध्ये दररोज सुमारे ५० ते ६० गाड्या खरबूज दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजारपेठेत भरपूर माल उपलब्ध आहे. खरबूज हे शरीराला थंडावा देणारे फळ मानले जाते, त्यामुळे उन्हाळ्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात याची खरेदी करत आहेत.

Pune: आमदार निघाले लंडनला! विधानसभेच्या सदस्यांचा परदेशात अभ्यास दौरा

आमदार निघाले लंडनला! विधानसभेचे आमदार यांचा परदेशात अभ्यास दौरा

विधानसभेतील १५ आमदार लंडनला रवाना

या दौऱ्यात लंडनमधील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांचा अभ्यास केला जाणार

२२ फेब्रुवारी पर्यंत आमदारांचा असणार लंडन दौरा

बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनीषा कायंदे, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर असे लंडन दौऱ्याला जाणाऱ्या आमदारांची नावे

अत्याधुनिक शहरी नियोजन, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम सार्वजनिक सेवा व्यवस्था आणि नागरिककेंद्रित प्रशासनाचा आमदारांकडून होणार अभ्यास

Mahad: महाडच्या शिवकालिन वीरेश्वर मंदिरात 250 किलो तांदळाची भव्य रांगोळी

महाशिरात्रीच्या निमित्ताने महाडच्या वीरेश्वर मंदिरात तांदळाची आकर्षक आशी रांगोळी साकारण्यात आली. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला काल महाशिवरात्रीपासून प्रारंभ झाला. या तादळाच्या रांगोळीसाठी तब्बल 250 किलो तांदळाचा वापर करण्यात आला. वीरेश्वराच्या गाभाऱ्यात पिंडीच्या बाजुला रंगीबेरंगी तादळाचा वापर करीत काढलेली हि रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Amravati: अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"

अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..

धारणी तालुक्यातील दहेंडा गावात यात्रेनिमित्त बोकड पटाची अनोखी स्पर्धा..

खाऱ्या टेंभ्रूच्या गावातील बोकडांचा डंका; गावातील पारंपरिक खेळाचा नवा प्रकार.

आदिवासी युवकांचा उत्साह;

लहान छकड्यांना जुंपून बोकडांची चुरशीची स्पर्धा पार पडली.

बैलगाडा शर्यतीला पर्याय म्हणून ‘बोकडपट’ची चर्चा रंगली.

मेळघाटातील या वेगळ्या स्पर्धेची जिल्हाभरात जोरदार चर्चा.

शिवभक्तांचे वाहन उलटले एक ठार, १७ जण जखमी

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एक ठार, तर सतरा भक्त जखमी झाले. हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ झाला. जखमींपैकी गंभीर १२ जण चंद्रपूरला, तर ५ जण वरोरा इथे हलवण्यात आले.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘संत सेवालाल महाराज’ यांचे नाव

वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com