Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक? पाहा ताजी आकडेवारी...

Mumbai Lakes Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे.
water level in mumbai lakes today
water level in mumbai lakes today Saam TV
Published On

Mumbai Lakes Water Level Today

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे. पाणीपुरवठ्याचा दुसरा कोणताही पर्यायी स्त्रोत नसल्याने येत्या काही दिवसांत महापालिकेकडून पाणीकपात होण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

water level in mumbai lakes today
Shetkari Andolan: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आज निघणार तोडगा? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावात केवळ ४८ टक्केच पाणीसाठा शिल्लक उरला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईला (Mumbai) भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा, अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मुंबईकरांना १ मार्चपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांतून दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. (Latest Marathi News)

या सातही तलावांत गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी सात लाख ९३ हजार ७०७ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. तर यावर्षीच्या १३ फेब्रुवारी रोजी सात लाख १४ हजार ६१३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो सात हजार २० दशलक्ष लिटरने कमी आहे.

तलावांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याच्या आधारे पुढील १८७ दिवस, म्हणजे ऑगस्टच्या मध्यापर्यंत तो पुरेसा आहे. मात्र, वेळेवर पाऊस न झाल्यास मुंबईत पाणीबाणीचं संकट निर्माण होऊ शकतं. हीच बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाण्याची मागणी केली आहे.

water level in mumbai lakes today
Daily Horoscope: वसंत पंचमीला जुळून आला खास योग; ५ राशींच्या लोकांचं भाग्य सूर्यासारखं चमकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com