MNS Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, मनसे २२५ जागांवर निवडणूक लढवणार, राज ठाकरेंची घोषणा

Maharashtra Politics Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्याला सुरुवात होत आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ही सर्वात मोठी घोषणा केली आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. २५ जुलै २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा लढवणार असल्याची सर्वात मोठी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्याला सुरुवात होत आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ही सर्वात मोठी घोषणा केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये मनसेचा राज्यव्यापी मेळावा पार पडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यात पक्षाचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची घोषणा केली.

"येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मनसेचे लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत. काही लोक हसतील, पण तर घडणार म्हणजे घडणार. युती होईल का? आघाडी होईल का? असा काही विचार करू नका, विधानसभेला २२५ जागा आपण लढवणार आहोत," असे म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच "काय परिस्थितीत आहे. काय घडू शकते, याचे आकलन करा. निवडून येण्याची कपॅसिटी असेल यांना तिकीट देणार आहे. तिकीट मिळाल्यावर मी पैसे काढायला मोकळा अश्या लोकांना तिकीट मिळणार नाही. जे जिल्हा अध्यक्ष, तालुकाअध्यक्ष आहेत, त्यांनी माहिती नीट द्या, तुमची माहिती चेक होणार आहे," असं म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दमही दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT