Basmath Assembly Constituency: वसमत विधानसभा मतदारसंघ; महाविकास आघाडी की महायुती? कोण मारणार बाजी

Basmath Assembly Constituency Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. त्यामुळे आता वसमत विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघ
Basmath Assembly ConstituencySaam Tv
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसुन कामाला लागले आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जयप्रकाश दांडेकर आणि जयप्रकाश मुंदडा (शिंदे गट) हे दोघे सर्वाधिक वेळा सत्तेत राहिले आहेत. या निवडणुकीत काय होणार, कोणत्या तिसऱ्या पक्षाला संधी मिळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सध्या महायुतीमध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घटक पक्ष आहेत, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले (Basmath Assembly Constituency) आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली होती. तर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून शिवाजीराव जाधव, शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा, काँग्रेसचे अब्दुल हाफिज अब्दुल रहमान, राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर हे चार उमेदवार रिंगणात (Maharashtra Politics) होते. त्यावेळी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारली होती, ६३ हजार ८५१ मतं मिळवून त्यांचा विजय झाला होता. वसमत विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा झंडा फडकला होता, मात्र २०१९ च्या निवडणुकीत स्थिती बदलली होती.

२०१९ ची विधानसभा निवडणूक

वसमत विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक महत्वाचा भाग (Vidhan Sabha Election 2024) आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ ​​राजुभैय्या रमाकांत नवघरे आणि अपक्ष अ‍ॅड. शिवाजी मुंजाजीराव जाधव यांच्यात चुरशीची लढत झाली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रमाकांत नवघरे ७५,३२१ मतं मिळवून दणक्यात विजयी झाले होते.

वसमत विधानसभा मतदारसंघ
Vidhan Sabha Election : उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार? सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

सध्या काय चित्र?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागले आहेत. अजून तरी वसमतमधून कोणताही इच्छुक उमेदवार डोकं वर काढताना दिसत नाही. वसमत विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तर मग यंदा शिवसेना वसमतमध्ये आपला गड राखणार का? हे पाहणं देखील महत्वाचं आहे.

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असु शकतो. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जयप्रकाश दांडेगावकर आणि शिंदे गटाचे जयप्रकाश मुंदडा या दोघांचेच वर्चस्व राहिले आहे. तर या वेळेस तरी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार (Ajit Pawar Vs Sharad Pawar) आहे का, याकडे वसमतकरांचं लक्ष लागलेलं आहे. हिंगोलीच्या वसमत विधानसभेत आगामी निवडणुकीमध्ये 'राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी' असा सामना रंगण्याची शक्यता आहे. सध्या वसमत विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत नवघरे मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा कोणता उमेदवार रिंगणात असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वसमत विधानसभा मतदारसंघ
Maharashtra Vidhan Parishad Election: काँग्रेसची मते फुटली, महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com