Maharashtra Politics: आजी- माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली! 'माझ्याविरोधातील व्हिडिओ जगजाहीर करावे', अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज

Maharashtra Politics Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis: देशमुख हे जेलमध्ये होते. आता बेलवर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांना थेट आव्हान दिले होते.
Maharashtra Politics: आजी- माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली! 'माझ्याविरोधातील व्हिडिओ जगजाहीर करावे', अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज
Maharashtra Politics Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis: Saamtv
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता. २५ जुलै २०२४

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. देशमुख हे जेलमध्ये होते. आता बेलवर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे.

Maharashtra Politics: आजी- माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली! 'माझ्याविरोधातील व्हिडिओ जगजाहीर करावे', अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज
Sangli Rain News: 'अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवा, अन्यथा सांगलीला महापुराचा धोका', महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

"काल देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोललो, माझावर दबाव होता असं वक्तव्य केले. अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. कशा पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला. आमच्या नेत्यांवर आरोप करण्यात सांगितले. याचे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव होता, यात माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत," असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

तसेच "देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की माझ्याकडेही व्हिडिओ क्लीप आहेत. त्यामध्ये मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत काही बोललो. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी ते व्हिडीओ क्लिप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल," असा दावा अनिल देशमुख यांनी केला असून देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहेत.

Maharashtra Politics: आजी- माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली! 'माझ्याविरोधातील व्हिडिओ जगजाहीर करावे', अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठं खिंडार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं

दरम्यान, देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली, जे सरकार विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले. ईडीचे वापर केला, पण सत्तेत सोबत गेले त्यांना क्लीनचिट मिळाली. त्यामुळे अनिल देशमुख बोलले हे खरे असतील, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics: आजी- माजी गृहमंत्र्यांमध्ये जुंपली! 'माझ्याविरोधातील व्हिडिओ जगजाहीर करावे', अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज
Amravati Accident : शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली; अपघातात १० शेतमजूर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com