Rupali Thombre  Saam TV
मुंबई/पुणे

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

Police Action Against Rupali Patil Thombare: राष्ट्रवाद काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खडक पोलिसांनी त्यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे.

Priya More

Summary -

  • रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  • सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

  • माधवी खंडाळकर यांच्यावर मारहाणीच्या प्रकरणानंतर हा वाद सुरू झाला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बहिणीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी रूपाली ठोंबरे खडक पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला.यानंतर पोलिसांनी रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे चर्चेला उधाण आले.

माधवी खंडाळकर या महिलेने रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला होता. काही जणांनी घरात घुसून माधवी खंडाळकरला मारहाण केली होती. या मारहाणीत माधवी खंडाळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. या महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रुपाली ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.

मात्र काही तासांतच या माधवी खंडाळकरने मैत्रिणी असल्याचे सांगत जुन्या वादातून दावा केल्याचे म्हणत सुरु झालेल्या नव्या वादाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांची बहीण प्रिया पाटीलसह आणखी तिघांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे या खडक पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना जाब विचारत आरेरावी केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT