Maharashtra Politics Saam
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: नवी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांनी 'हात' सोडला

Navi Mumbai: नवी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. यामुळे नवी मुंबईत आता अजित पवार गटाची ताकद वाढली.

Priya More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत. आता नवी मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अघमकर यांनी पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसची ताकद कमी होऊन अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटांनी सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अघमकर यांच्यासह २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत युवक काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

तसेच, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुद्धा विरोधकांवर निशाणा साधला आहे. आमच्याकडे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही. "कुत्रे भुंकतात, हत्ती आपल्याच डौलात चालतो," अशा शब्दांत आनंद परांजपे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, याआधी विदर्भातील अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रीवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित भरगड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर अजित पवार गटाची ताकद वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT