CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election 2024: गोविंदा, अब्दुल सत्तार ते श्रीकांत शिंदे अन् शेवाळे; शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक मैदानात!

Shinde Group Star Campaigners: रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे.

Priya More

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात देखील झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते वरिष्ठ राजकीय नेत्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकूण ४० स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या सर्वाची तोफ राज्यभर धडाडणार आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेसह अनेक राजकीय नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. प्रचाराचे दिवस शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी

एकनाथ शिंदे

रामदास कदम

गजानन किर्तीकर

आंदनराव आडसूळ

प्रताप जाधव

गुलाबराव पाटील

निलम गोरे

मिना कांबळी

उदय सामंत

शंभूराज देसाई

दीपक केसरकर

तानाजी सावंत

दादा भुसे

संजय राठोड

अब्दुल सत्तार

भरत गोगावले

संजय शिरसाट

श्रीकांत शिंदे

धैर्यशील माने

नरेश मस्के

श्रीरंग बारणे

मिलिंद देवरा

किरन पावसकर

राहुल शेवाळे

शरद पोंक्षे

मनीषा कायंदे

गोविंदा

कृपाल तुमाणे

दीपक सावंत

अनंद जाधव

ज्योती वाघमारे

शीतल म्हात्रे

राहुल लोंढे

हेमंत पाटील

हेमंत गोडसे

राजू वाघमारे

मिनाक्षी शिंदे

ज्योती भोसले

तेजस्वी केंद्रे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT