Sharad Ponkshe Movie: अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट

Sharad Ponkshe And Sneh Ponkshe Upcoming Film: या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकताच प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि चित्रपटाचा शुभारंभ केला.
Sharad Ponkshe And Sneh Ponkshe
Sharad Ponkshe And Sneh PonksheSaam Tv

Sharad Ponkshe And Sneh Ponkshe:

मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे हे नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता ते एका नव्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मुलगा अर्थात स्नेह पोंक्षे (Sneh Ponkshe) करणार आहे.

सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकताच प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि चित्रपटाचा शुभारंभ केला.

वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या 'प्रॅाडक्शन नं १' या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही वडील-मुलाची जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत. हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

या चित्रपटाचे निर्माते शरद पोंक्षे यांनी सांगितले की, 'एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे की तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.'

Sharad Ponkshe And Sneh Ponkshe
Prakash Raj Birthday: १२ वर्षे लहान कोरिओग्राफरसोबत प्रकाश राज यांनी थाटला दुसरा संसार, अभिनेत्याचं खरं नाव माहितीये का?

तर या चित्रपटाचा दिग्दर्शक स्नेह पोंक्षेने सांगितले की, 'लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा विशेष आनंद आहे.'

Sharad Ponkshe And Sneh Ponkshe
Madgaon Express Vs Swatantrya Veer Savarkar Collection:'मडगांव एक्सप्रेस'ने कमाईमध्ये पकडला वेग, 'स्वातंत्र्यवीर सावरकर'ला टाकलं मागे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com