Madgaon Express Vs Swatantrya Veer Savarkar Collection:'मडगांव एक्सप्रेस'ने कमाईमध्ये पकडला वेग, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला टाकलं मागे

Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie: रणदीप हुड्डाच्या स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटातील रणदीपच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. कुणाल खेमू दिग्दर्शित मडगांव एक्सप्रेस चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie
Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar MovieSaam Tv

Madgaon Express Vs Swatantrya Veer Savarkar :

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्वतंत्र वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar Movie) आणि प्रतीक गांधीचा 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express Movie) या चित्रपटांना विकेंडसोबत सोमवारच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झाला. दोन्ही चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. दोन्ही चित्रपटांकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत पण बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची सुरुवात संथ गतीने झाली. आता मडगांव एक्सप्रेसने कमाईच्या बाबतीत चांगला वेग पकडला आहे. मडगांव एक्सप्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला मागे टाकले. या चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली हे आपण पाहणार आहोत....

रणदीप हुड्डाच्या स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटातील रणदीपच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1 कोटी 50 लाखांची कमाई केली होती. शनिवारी 2 कोटी 5 लाखांची आणि रविवारी 2 कोटी 7 लाखांची कमाई केली होती. सोमवारी देखील या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली. या चित्रपटाने सोमवारी 2 कोटी 25 लाखांची कमाई केली. या चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन 8 कोटी 7 लाखांवर पोहचले आहे.

कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगांव एक्सप्रेस' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता दिव्येंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम यासारख्या स्टार्सचा 'मडगांव एक्सप्रेस' हा चित्रपट देखील शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटी 50 लाखांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत चांगली सुधारणा झाली. शनिवारी या चित्रपटाने 2 कोटी 75 लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2 लाख 8 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 2 कोटी 60 लाखांची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 9 लाख 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, 'योद्धा', 'शैतान' आणि 'आर्टिकल 370' हे चित्रपट देखील थिएटरमध्ये अजूनही सुरू आहेत. त्यामुळे 'मडगांव एक्सप्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत नाही. या दोन चित्रपटांसोबत सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'शैतान' चित्रपट देखील चांगला चालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 128 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाने आतापर्यंत 29.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' चित्रपटाने पाचव्या शनिवारी 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie
Sharad Ponkshe Movie: अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com