Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त बंडखोर उमेदवारांनी मागे घ्यावी, यासाठी मागील चार दिवसांपासून मविआ आणि महायुती नेते मोहिमेवर होते. काही ठिकाणी बंड शमवण्यात यश आले तर अद्यापही काही ठिकणी बंडबा थंड झालेले नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रात १३ मतदारसंघामध्ये महायुती आणि मविआ दोघांनाही बंडखोरीचा फटका बसू शकतो. त्यामुळे बंड थंड करण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले, बैठका घेतल्या आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल, त्याआधी बंडखोरी शमवण्यासाठी सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे बंड झालेत, त्या मतदारसंघाबाबत जाणून घेऊयात...
पश्चिम महाराष्ट्र टॉप बंडखोरी
1) दौंड
महायुती - राहूल कुल ( भाजप )
महाविकास आघाडी - रमेश थोरात ( राष्ट्रवादी शरद पवार )
वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी अजीत पवार बंडखोर)
2)– इंदापूर
महायुती - दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
महाविकास आघाडी - हर्षवर्धन पाटील (शरद पवार राष्ट्रवादी)
अपक्ष - प्रवीण माने( बंडखोर राष्ट्रवादी शरद पवार )
3)– पुरंदर
महायुती - विजय शिवतारे ( शिंदेंची शिवसेना )
महाविकास आघाडी - संजय जगताप ( काँग्रेस )
संभाजी झेंडे (अजित पवारांची राष्ट्रवादी)
4) चिंचवड विधानसभा मतदारसंघ -
महायुती- शंकर जगताप (भाजप)
महाविकास आघाडी - राहुल कलाटे (शरद पवार राष्ट्रवादी)
विठ्ठल उर्फ नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बंडखोर अपक्ष) -
5)भोसरी विधानसभा मतदार संघ - 207
महायुती - महेश लांडगे भाजप
महाविकास आघाडी - अजित गव्हाणे (राष्ट्रवादी शरद पवार)
रवी लांडगे (बंडखोर शिवसेना ठाकरे)
6 )शिवाजीनगर मतदारसंघ 209
महायुती - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
महाविकास आघाडी- दत्ता बहिरट ( काँग्रेस)
मनीष आनंद - (बंडखोर काँग्रेस उमेदवार)
7)पर्वती विधानसभा 212
महायुती- माधुरी मिसाळ (भाजपा)
महाविकास आघाडी -अश्विनी कदम (शरद पवार राष्ट्रवादी)
आबा बागुल ( बंडखोर काँग्रेस)
8 )पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ 214
महायुती- सुनील कांबळे (भाजपा)
महाविकास आघाडी- (रमेश बागवे काँग्रेस)
भरत वैरागे (बंडखोर भाजप)
9 )कसबा विधानसभा 215
महायुती - हेमंत रासने (भाजपा)
महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
कमल व्यवहारे ( बंडखोर काँग्रेस अपक्ष)
10)सांगली
पृथ्वीराज पाटील - काँग्रेस
सुधीर गाडगीळ - भाजप
जयश्री पाटील - काँग्रेस बंडखोर अपक्ष
11) माढा
अभिजीत पाटील - शरद पवार राष्ट्रवादी
मीनल साठे - अजित पवार राष्ट्रवादी
रणजितसिंह शिंदे -अपक्ष
12 )पंढरपूर
समाधान आवताडे - भाजप
भगिरथ भालके - काँग्रेस
अनिल सावंत - शरद पवार राष्ट्रवादी
13) मिरज
सुरेश खा़डे - भाजप
तानाजी सातपुते - ठाकरे शिवसेना
मोहन वनखंडे - अपक्ष काँग्रेस बंडखोर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.