Sanjay Raut News SaamTv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: पैसे जिथे पोहोचवायचे आहेत तिथे पोहोचवले, उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणीचा व्हिडीओ समोर आला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Priya More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची यवतमाळमध्ये तपासणी करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची बॅग तपासली. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची बॅक तपासणी करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणीचा व्हिडीओ समोर आला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'जिथे पैसे पोहोचवायचे आहेत त्यांनी ते पोहोचवले आहेत. अगदी पोलिस बंदोबस्तात आणि पोलिसांच्या गाडीत हे पैसे पोहोचले आहेत.', असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'निवडणूक आयोग आणि त्यांची लोकं यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आम्ही गेल्या ५-१० वर्षांत पाहिलेली नाही. त्यांचं काम आहे तपासण्या करणं, नाकाबंदी करणं. पण निवडणूक आयोगाच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत हे सुद्धा गेली तीन वर्षे सर्वांनी पाहिलं आहे. निवडणूक आयोगाने आमदाराच्या अपात्रेबाबत कायद्याचे उल्लंघन करून निर्णय घेतला.'

'शिवसेना हा पक्ष, चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हातात गेलं आणि प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही. राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅग तपासणी निवडणूक काळात करणे हे काही चुकीचे आहे असे आम्ही मानत नाही. पण एक साधा सेन्स आहे जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते काही उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपला बॅगमधून येतात का हा साधा सेंस आहे', असं मंत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

तसचं, 'लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बॅग कशा हेलिकॉप्टरमधून वाहत होते हे आम्ही दाखवले आहे. त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमानाला की त्याची झडती घ्यायची हा खेळ कळत नाही का पैसे पोहोचले आहेत. लोकांचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा आणि गौतम अदानी लोढा यांना जिथे पैसे पोहोचवायचे आहेत त्यांनी ते पोहोचवले आहेत. अगदी पोलिस बंदोबस्तात आणि पोलिसांच्या गाडीतून बग पोहोचले आहेत या गाड्या कुठे थांबवल्या त्याची झडती घेतली असे आम्ही पाहिले नाही. हे जे म्हणत आहे प्रसंगी अमित शहा आणि प्रधानमंत्री यांची गाडी तपासून करून दाखवा .' असे चॅलेंज संजय राऊत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT