Maharashtra Politics : ये तो ट्रेलर है... मैं खुद की भी नहीं सुनता; डायलॉगमधून एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
अमर घटारे, दर्यापूर | साम टीव्ही
Eknath Shinde in Daryapur : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...एक बार कमिटमेंट कर दी, तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता... दर्यापूर मतदारसंघाच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदी चित्रपटांतील डायलॉगनं विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो, लाडकी बहीण योजना विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सावत्र आणि दृष्ट भाऊंपासून तुम्हाला सावध राहायचं आहे, असं सांगतानाच शिंदे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
अभिजीत अडसूळ हे जर विधानसभेत पोहचले तर आणखी विकास होईल.
लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो, लाडकी बहीण योजना विरोधकांच्या पोटात दुखत आहे.
अडीच वर्षे आम्ही काही तुमचे हात बांधले होते काय?
सावत्र भाऊ, दृष्ट भाऊ यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे.
लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेक लोक कोर्टात गेले.
१०० वेळा जेलमध्ये जाण्यास तयार - शिंदे
अनेक लोक म्हणतात की योजना बंद होईल. आम्ही अनेकांना जेलमध्ये टाकू, पण आमच्या लाडक्या बहिणींसाठी एकदा नाहीतर 100 वेळा जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे.
हे लोक खोटे बोलतात, खोटारडे आहेत, असले धंदे लोक खपवून घेणार नाहीत.
आता लाडकी बहीण योजना पंधराशेवरून २१०० रुपये केली आहे
मला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे.
शेतकरी सन्मान योजना बारा हजारांवरून पंधरा हजार रुपये करणार आहे.
अडसूळ यांचं विमान उडवा, विधान भवनात पोहोचवा - शिंदे
महायुतीमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांची हा एकनाथ शिंदे नोंद घेईल.
दर्यापूर मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील ते माझ्याकडे द्या. हे शंभर टक्के मी पूर्ण करेल.
20 तारखेला कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचं विमान उडवा, विधान भवनात पोहचवा.
मला कॉमन मॅनवरून सुपरमॅन बनायचं आहे - शिंदे
50 ते 60 वर्षांत लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते का? पण ते आम्ही पूर्ण केलं.
मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीतर, कॉमन मॅन समजतो.
मला कॉमन मॅनवरून सुपरमॅन बनायचं आहे.
महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकायचं काम करू नये. रवी राणा यांना सुद्धा सांगतो की तुम्ही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा काम करू नये. आम्ही तुमच्या मागे संकटकाळात उभे होतो.
महायुतीमध्ये राहून महायुतीच्या विरोधात कोणी काम करता कामा नये.
शिंदेंचे डायलॉग, विरोधकांना आव्हान
प्रशिक्षित तरुणांना आम्ही दहा हजार रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला.
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी हैं!
काही लोक म्हणतात बाहेरचं पार्सल आहे. खासदार झाले, आमदार झाले. बाहेरच्या लोकांना बाहेर पाठवा आणि अभिजीत अडसूळ यांना निवडून आणा.
दिलेला शब्द पाळतो - शिंदे
हे सरकार देणारं आहे. लेना बँक नाही.
लोकांनी म्हटले होते की नोव्हेंबरमध्ये लाडकी बहीण योजना बंद होईल.
पण तुमचे पण भाऊ हुशार आहेत. आम्ही आधीच तुमचे पैसे देऊन टाकले.
आम्ही दिलेला शब्द पाळतो. प्राण जाये पण वचन ना जाये.
एक बार कमिटमेंट कर दी, फिर मैं खुद की भी नही सुनता.
महाविकास आघाडी विकासविरोधी आघाडी आहे - शिंदे
विरोधकांनी संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडी ही विकासविरोधी आघाडी आहे. तुम्हाला फसवतात.
राज्यस्थान, कर्नाटकमध्ये खोटे बोलून निवडून आले. आणि आता म्हणता की प्रिंटिंग मिस्टेक झाली.
आम्ही दिलेला शब्द पाळतो. जे बोललो ते करून दाखवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

