Manasvi Choudhary
ऑफिस किंवा कॉलेजला नेमकी केसांची कशी हेअरस्टाईल करावी असा प्रश्न सर्व महिला व मुलींना पडतो.
तुम्हालाही ऑफिस किंवा कॉलेजमध्ये स्टायलिश दिसायचे असल्यास तुम्ही या 5 हेअरस्टाईल्स नक्की ट्राय करा
केसांची वरच्या बाजूला हाय पोनीटेल बांधा यामुळे तुमचा लूक सिंपल आणि स्टायलिश दिसतो.
हाफ-अप टॉप नॉट या हेअरस्टाईलमध्ये कानाच्या वरचे केस घेऊन एक छोटा पोनीटेल बांधा आणि खालचे केस मोकळे सोडा ही स्टाईल तुम्ही करू शकता.
केसांची सैल लो पोनी बांधा त्यांनतर केसांचे दोन भाग करून त्यामधून एक साईड आतल्या बाजूने बाहेर काढा लो ट्विस्टेड पोनीटेल हेअरस्टाईल होईल.
साईड ब्रेड विथ ट्विस्ट या हेअरस्टाईलमध्ये समोरच्या एका बाजूची केसांची बट घेऊन ती गोल फिरवत मागे नेऊन पिन लावा. त्यानंतर उरलेल्या सर्व केसांची एका बाजूला सैलसर वेणी घाला.
एखाद्या घाईच्या वेळी एखादा छान 'क्लचर' किंवा 'बो लावल्यास तुमची हेअरस्टाईल आणखी छान दिसते.