Eknath Shinde , Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politcs : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?

Maharashtra Cabinet Expansion : पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पडेल, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडत असतानाच दुसरीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पडेल, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदे भरली जातील. त्याचबरोबर महामंडळाचे देखील वाटप करण्यात येईल. निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्याचा हा महायुतीचा प्रयत्न असेल, असंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या आमदारांना किती मंत्रिपदं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. नुकतीच राज्यातील ४८ लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला.

महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात हेच चित्र असेल, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करून आमदारांना बळ देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.

शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला नेमके किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. संदिपान भुमरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची जागा देखील रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT