NCP News: अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलं? तटकरे-पटेलांमध्ये वाद की कॅबिनेटवर ठाम?

Praful Patel Vs Sunil Tatkare : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमधील अंतर्गत वादामुळे अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं मात्र ते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम असल्याचं भाजपनं सांगितलंय. नेमकं मंत्रिपद कशामुळे लटकलंय यावरचा हा विशेष रिपोर्ट.
NCP News: अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलं? तटकरे-पटेलांमध्ये वाद की कॅबिनेटवर ठाम?
Praful Patel Vs Sunil Tatkare

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केद्रातल्या मंत्रिपदावरून वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव होता. मात्र अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही मंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे मंत्रिपदावरून अंतर्गत वाद झाल्याची चर्चा आहे. आता या वादात अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलंय.

त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार गटाच्या कुणाचाही शपथविधी होणार नाही. तर स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली असून अजित पवार गटाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केलाय.

खरं म्हणजे अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात शिंदे गटाचा मोठा अडथळा आहे. कारण शिंदे गटाचे सात खासदार निवडून येऊनही त्यांनाही स्वतंत्र प्रभार असलेलं एकच राज्यमंत्रिपद देण्यात आलाय. त्यामुळे भाजप अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यास तयार नाही. मात्र यामुळे विरोधकांना अजित पवार गट आणि भाजपवर टीकेची आयती संधी मिळालीय. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया रोखण्यासाठी कदाचित मंत्रिपद घेतलं नसावं असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय.

लोकसभेत जो निवडून आला त्यालाच मंत्रिपदासाठी प्राधान्य द्यायला हवं अशी भूमिका तटकरेंनी मांडल्याचं कळतंय. त्यामुळे पटेल आणि तटकरेंच्या वादामुळे मंत्रिपद लटकलय़ की जागावाटपात माघार घेणारे अजित पवार खरंच कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम आहेत हा खरा प्रश्न आहे. यामुळे मात्र अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलं असून मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला तूर्तास तरी स्थान नाही.

NCP News: अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकलं? तटकरे-पटेलांमध्ये वाद की कॅबिनेटवर ठाम?
Modi Cabinet 2024: मंत्रिपदासाठी शिंदेंच्या खासदारांना थेट दिल्लीतून फोन; अजित पवारांचे खासदार वेटिंगवर? नेमकं काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com