Devendra Fadnavis Comment-on Harshwardhan Pati Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra News : हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात, राष्ट्रवादीत आनंदी आनंद; पण फडणवीसांनी हवाच काढली

Devendra Fadnavis Comment-on Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला. कारण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी भाजपला रामराम ठोकला. तसेच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. इंदापुरात धुमधडाक्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरात मोठी ताकद आहेत. त्यांनी अचानक साथ सोडल्याने भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभेची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेतील ही जुनी न्यूज आहे. तुम्ही नवीन काय सांगताय, ही आजची न्यूज थोडी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.

दरम्यान, इंदापूरमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून जनतेनं उठाव झाला आणि त्यांनी तुतारी हातात घेण्यास सांगितलं. राजकारणात असं पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो, असं हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या अंकिता पाटील आणि मुलाने देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकल्यानंतर इंदापुरात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील आमदार दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण, दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

याआधी देखील इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी दोनवेळा लढत झालेली आहे. या दोन्ही निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. मात्र, यंदा निवडणुकीचे चित्र वेगळं असून शरद पवार यांच्या बाजूने सहानुभुतीची लाट आहे. त्यामुळे दत्तात्रय भरणे यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT