Harshvardhan Patil : शरद पवारांची डोकेदुखी वाढली, इंदापुरात सांगली पॅटर्न, महायुतीला फायदा होणार?

Indapur Harshvardhan Patil join NCP (SP) : हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकली, इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या पार्टीमध्ये बंडखोरीची शक्यता निर्माण झाली.
Maharashtra Politics  harshvardhan patil sharad pawar
harshvardhan patil sharad pawarSaam Tv
Published On

Indapur Assembly constituency : हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil News) यांनी तुतारी हातात घेतल्यामुळे इंदापूरमधील राजकीय वातावरण बदलले आहे. इंदापूरमध्ये (Indapur News) शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली आहे. प्रवीण माने यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभेचा सांगली पॅटर्न (sangli pattern) आता इंदापूरमध्ये होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा इंदापूरमधील तगडा नेता पक्षात आलाय, पण यामुळे शरद पवार (Sharad pawar News) यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली, तर नाराजीचा आणि बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा फायदा सत्ताधारी महायुतीला बसू शकतो. त्यामुळे शरद पवार इंदापूरमधून सांगली पॅटर्न कसा मोडून काढतात? याची पक्षामध्ये चर्चा सुरु आहे.

Maharashtra Politics  harshvardhan patil sharad pawar
VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

सांगली पॅटर्न नेमका काय?

लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसने ठाकरेंच्य शिवसेनेला सोडली. पण काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा निर्णय अमान्य आहे, असं म्हणत त्यांनी रणशिंग फुंकले होते. विशाल पाटील यांना विश्वजीत कदम यांनी सपोर्ट केला होता. विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये अपक्ष झेंडा रोवला होता. या सांगली पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. आता प्रवीण मानेही बंड पुकरण्याच्या तयारीत आहेत. इंदापूरमध्ये प्रवीण माने अपक्ष मैदानात उतरण्याची शक्यता आहे. प्रवीण माने अपक्ष उतरल्यास राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मोठा फटका बसू शकतो. मत विभागल्यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराला मोठा फायदा होऊ शकतो. इंदापूरमध्ये सध्या सांगली पॅटर्नची जदोदार चर्चा सुरु आहे.

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छूक असणारे प्रवीण माने यांनी आपली तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रवीण माने यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. आता हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे प्रवीण माने अवस्वस्थ असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. समर्थकांकडून माने यांची भेट घेऊन भूमिका जाणून घेण्यात येत आहे. काही समर्थकांच्या मते माने यांनी बंडखोरी करत अपक्ष लढावे. प्रवीण माने काय निर्णय घेणार? याकडे तालुक्यातील समर्थकांचे लक्ष लागलेय.

Maharashtra Politics  harshvardhan patil sharad pawar
Maharashtra Politics: विधानसभेतही सांगली पॅटर्न? रोहित पाटील यांच्याविरोधात विशाल पाटलांची बंडाळी?

इंदापूरसाठी इच्छूकांच्या रांगा -

इंदापूर विधानसभेसाठी इच्छूकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी मागितली आहे. दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, प्रवीण माने, तेजसिंह पाटील, अमोल भिसे, अशोक घोगरे हे इंदापूरमध्ये इच्छूक आहेत. यामध्ये आता हर्षवर्धन पाटील यांचीही भर पडली आहे.

आयात केलेल्या नेत्याला उमेदवारी नको, असा सूर काही नेत्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्याचं बोलले जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com