Eknath Shinde And Devendra Fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंवर कुरघोडी, नगरविकास'च्या उधळपट्टीला चाप? मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

Eknath Shinde And Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून विविध योजनांच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू आहे. या उधळपट्टीवर आता मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे.

Priya More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला चाप लावल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून विविध योजनांच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू आहे. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी चाप लावल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध योजनांमधील विकास कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून मान्यता घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती नगरविकास विभागातील सुत्रांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांवर उधळपट्टी केली जात आहे. नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अशामध्ये कोणत्याही विकास कामांना मंजुरी देण्यापूर्वी किंवा काहीही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या फाईल जातील अशी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर कुरघोडी होत असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

नगरविकास विभागातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता कठोर भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास विभागातील योजनांच्या मंजुरीसाठी आता मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सरकारी योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चावर चाप बसण्याची शक्यता आहे.

निवडणुकीआधी अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना भरीव निधी दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेची हुकूमत असलेल्या महानगरपालिकांवर खास मेहरबानी असल्याचीही महिती सुत्रांकडून मिळत आहे. तर भाजप, राष्ट्रवादीची ताकद असलेल्या महानगर पालिकांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या सगळ्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Accident : मध्यरात्री परभणीत भीषण अपघात, ट्रक अन् ऑटोच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

Shocking: जंगलात ओढत नेत मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांच्या तावडीतून पळाली; पण ट्रक चालकानेही अंगाचे लचके तोडले

धक्कादायक! एस्केलेटरमध्ये अडकलं तरुणाचं डोकं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

PMC Recruitment: इंजिनियर झालात? पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT