Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

How BJP Plans to Split Marathi Votes: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपनं मायक्रोप्लॅनिंग सुरु केलीय. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास भाजप त्यांना कसं रोखणार?
Devendra Fadnavis during a strategic meeting to discuss BJP’s microplanning for the BMC elections, targeting wards influenced by the Thackeray brothers.
Devendra Fadnavis during a strategic meeting to discuss BJP’s microplanning for the BMC elections, targeting wards influenced by the Thackeray brothers.Saam Tv
Published On

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप मायक्रोप्लॅनिंग सुरु केलीय. याचं मायक्रोप्लॅनिंगनुसार भाजपचा ऍक्शन प्लॅनही ठरलाय.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपनं रणनीती आखलीय. भाजपनं मनसे आणि ठाकरे सेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरून त्याठिकाणी मतांची विभागणी कशी होईल याकडे लक्ष देण्यावर भर दिलाय. ठाकरे बंधुंना रोखण्यासाठी भाजपनं काय रणनीती आखलीय

बीएमसीसाठी भाजपचा प्लॅन

मराठी मतं ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता असल्यानं खबरदारी

मुंबईत महायुतीत वाद नको, समन्वय राखण्याच्या सूचना

ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन मतविभागणीची रणनीती

मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना भाजपकडे वळवण्याचा प्लॅन

आगामी सण उत्सवात अधिकाधिक नागरिकांपर्यत पोहचण्याच्या सूचना

दरम्यान गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राज्याच्या विविध भागांतील भाजप आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काय रणनीती असावी, याबाबत आमदारांची मतं जाणून घेतली. त्यानुसारच भाजपचा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना काय कानमंत्र दिलाय.

फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र

मतदारसंघात प्राधान्यक्रमाची कुठली 5 कामं करायची आहेत, त्याची यादी द्यावी

जनतेत सरकारबद्दल चांगला संदेश जाईल अशी कामं सूचवा

मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा, जास्त बोलू नका

बोलल्यानं उगाच वाद ओढावतात, माध्यमांशी बोलणं टाळावं

मुंबईसह राज्यात महायुतीतच निवडणूक लढवायची आहे

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजप कामाला लागलंय. त्यामुळे ठाकरे बंधू भाजपच्या प्लॅनिंगला छेद देऊन मराठी मतांची एकी घडवून आणणार का? पालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँड सत्ताधाऱ्यांना कसं आव्हान देणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com