Politics: जयंत पाटलांनी राजीनामा दिल्याची चर्चा, महायुतीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी 'एका' शब्दात उत्तर दिलं

CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादी शरद पवार गटात फेरबदलाची चर्चा, जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती. शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडून ‘शुभेच्छा’ प्रतिक्रिया.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार गटात सुरू असलेल्या फेरबदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी शुभेच्छा देत एका शब्दात उत्तर दिलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सुरू असलेल्या फेरबदलांबाबत प्रश्न विचारला. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे, त्यांची जागा शशिकांत शिंदे यांना देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

Devendra Fadnavis
HIV: असुरक्षित शारीरिक संबंध, वापरलेली सुई अन्.. HIV कशामुळे होतो? सुरूवातीला दिसतील 'ही' लक्षणं

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'खरंतर त्यांचा हा अंतर्गत विषय आहे. ज्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा, जे आगामी या पदाची धुरा सांभाळणार, त्यांनाही शुभेच्छा..सगळ्यांना चांगलं आणि छान काम करावं या शुभेच्छा', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis
स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं | Shocking

यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना, 'जयंत पाटील महायुतीत येणार आहेत का?' असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 'नाही' असं उत्तर दिलं. त्यामुळे जयंत पाटील महायुतीत जाणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून जवळपास स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com