Devendra Fadnavis -Eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: 'होय आमच्यात मतभेद, पण...', एकनाथ शिंदेंसोबतच्या रूसव्या -फुगव्यांवर मुख्यमंत्री स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis -Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद असून दोघांमधील दुरावा वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. खरंच असं काही आहे का? यावर मुख्यमंत्र्यांनी सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मत सांगितले.

Priya More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही तरी भिनसलं असून दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा वाढला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. खरंच या दोन्ही नेत्यांमध्ये काही वाद सुरू आहेत का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं. 'एका घरात दोन भाऊ असतात. त्या दोघांची वेगवेगळी मतं असतात. तसंच काही गोष्टींवर आमचं एकमत होत नाही.', असं उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस यांच्या दुराव्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आपल्या घरामध्येही दोन भावांची प्रत्येक गोष्टीत मत एक सारखी नसतात. ती वेगवेगळी असतात. आपली मतं प्रखरतेने दोन्ही भाव मांडत असतात. तसं काही गोष्टींवर आमचं एकमत नाही होत. सगळ्या गोष्टीत एकमत झालं असतं तर आम्ही वेगळ्या पक्षात कशाला राहिलो असतो. एकच पक्ष राहिलो असतो. त्यामुळे आम्ही तिघेही वेगवेगळे पक्ष आहोत. आमची काही मतमतांतर आहेत पण ब्रॉडर इशूजवर आम्ही एकत्र आहोत.'

तिन्ही पक्ष एकत्रच असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, 'आम्ही एकत्रित आहोत आणि आम्ही एकत्रित राहणार आहोत. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत आम्ही सोबत आहोत की नाही आहोत. शेवटी कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपण प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्यांवर लादू शकत नाही. आमच्या निवडणुका आहेत तर तुम्ही राबराब राबून काम करा आणि तुमच्या निवडणुका आल्या की तुमच्यावर गोष्टी आम्ही लादू असं चालत नाही. त्यांच्याही भावनेची कदर आपल्याला करावी लागते आणि म्हणूनच आम्ही नगरपालिकेत निर्णय घेतला की शेवटचा कार्यकर्ता लढतो. ठीक आहे जिथे शक्य आहे तिथे करू. असेही आपल्याला दिसलं की तिघेही वेगळे लढतोय. असंही दिसलं की तिघे एकत्रित लढतोय. सगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आम्ही या निवडणुकीमध्ये पार पाडलेली आहेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे महापालिकेची निवडणूकही कार्यकर्त्यांचीच आहे. पण त्याच्यामध्ये स्टेक्स मोठे आहेत. अशा प्रकारचा एक पिक्चर आहे. त्यामुळे तिथे आम्ही एकत्रित येण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणारच आहोत'

युती किती दिवस पुढे घेऊन चालणार यावर मुख्यंमत्री म्हणाले की, 'आमच्या मित्रांना सोबत ठेवण्याचा निर्णय आमचा आहे. ताकद वाढली असेल तर आम्हाला दोन्ही मित्रांची गरज आहे. भविष्यातही २०२९ मध्येही आम्ही युतीनेच निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे आम्ही ताकद वाढवतच राहू. आम्ही कुठेही आपली ताकद कमी होऊ देणार नाही. ताकद वाढवत राहू पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून द्यायचं असं आम्ही कधीच करणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राजभवनाचं नाव आता लोकभवन

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Chole Bhaji Recipe: ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी कशी बनवायची?

मतदान केंद्रावर दोन गटांत तुफान राडा! आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले|VIDEO

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

SCROLL FOR NEXT