CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

IIT Bombay Calls It IIT Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करण्याची मागणी पुन्हा जोरदारपणे मांडली. ‘बॉम्बे’च्या सर्व खुणा नाहीशा व्हायला हव्यात, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एचआरडी मंत्रालयाला पत्र लिहिण्याची घोषणा केली.

IIT बॉम्बेचे नामांतर करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. यावरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉम्बेचा मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा रामभाऊ नाईक यांचा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्यासाठी ते बॉम्बे नसून मुंबईच आहे...अशा बॉम्बेच्या ज्या खुणा आहे. त्या संपल्या पाहिजे त्या ठिकाणी मुंबईचं आलं पाहिजे. मी स्वतः देशाचे एचआरडी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती करणार आहे. आयआयटी बॉम्बेच नाव आयआयटी मुंबई केलं पाहिजे. हे करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारचे विनंती करत नाही पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com