Mumbai News  Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भंडाऱ्यात भाजपला 'जोर का झटका'; जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह शेकडो समर्थकांचा ठाकरे गटात प्रवेश

Mumbai News: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Maharashtra Political News:

आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू असून जोरदार इनकमिंग, आऊटगोईंग सुरू आहे. अशातच भाजपला ठाकरे गटाने मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या भंडारा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह अडीचशे समर्थकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर आता इतर पक्षातून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यात (Bhandara) भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) भंडारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नरेंद्र पहाडे यांनी आपल्या अडीचशे हुन अधिक समर्थकांसह मुंबईच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि संपर्कप्रमुख प्रवीण कुमार खोपडे आदि नेते उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र पहाडे यांना हातात शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी नरेंद्र पहाडे हे इच्छुक असताना भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली होती तेव्हापासूनच ते भाजपात अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा...

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "आत्ता जरी गद्दारी झाली असली तरी एकजुटीने लढुया, गद्दारांचे पर्व उखडून पुन्हा भगवा फडकवू..". असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT