Nandgaon News: नांदगाव तालूका दुष्काळी जाहीर करा; सत्ताधारी अजित पवार गटाचे उपोषण

Manmad News : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत नांदगावचे नाव नाही
Manmad News
Manmad NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यात कमी पाऊस (Rain) झालेल्या ४० तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र यातून वगळण्यात आलेल्या (Nandgaon) नांदगाव तालुका देखील दुष्काळी जाहीर करावा; या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

Manmad News
Cotton Price: घरात साठवून ठवलेला कापूस काढला विक्रीला; भाव नसल्याने शेतकरी हतबल

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत नांदगावचे नाव नाही. यामुळे नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा; या मागणीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आजपासून नांदगाव तहसील कार्यालयावर उपोषणाला सुरुवात केली. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manmad News
Ahmednagar News: जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध; नाशिक, नगरमधून पाणीप्रश्न पेटणार

घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध 

नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊनही प्रशासनाच्या निष्काळजीपणाने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालूक्यात समावेश न करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. शासनाने त्वरीत नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. गुरांसाठी चारा छावण्या, मागिल वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीचे अनुदान जाहीर करावे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com