Aaditya Thackeray On sada sarvankar: 'बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?'

Aaditya Thackeray News: 'मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Aaditya Thackeray On sada sarvankar:
Aaditya Thackeray On sada sarvankar:Saam tv
Published On

Aaditya Thackeray On sada sarvankar News:

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासा अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.

आता सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरुनच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत टीका केली आहे. 'मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद हे ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे होते. आता या पदावर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Aaditya Thackeray On sada sarvankar:
Maharashtra Politics: 'निकालासंदर्भात खोटे पसरवण्याचे काम, हिंमत असेल तर निवडणुका लावा...' कॉंग्रेसचे भाजपला थेट आव्हान

आदित्य ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत करत म्हटलं की, 'दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता, असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे-भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले'.

'हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण... या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला.

Aaditya Thackeray On sada sarvankar:
Bharat Jodo Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा-२' डिसेंबरपासून सुरू होणार? नियोजनात मोठा बदल होण्याची शक्यता

'खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com