क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या चिखली गावात ही घटना घडली आहे. निवृत्तीनाथ कावळे असं २४ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांना आरोपी करण बिलवणे याला देखील अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीनाथ आणि करण दोघेही गावातील एका खुल्या मैदानात क्रिकेट खेळत होते. आणखी एक मॅच खेळण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. आधी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र नंतर वाद इतका टोकाला गेला की करणने निवृत्तीवर बॅटने हल्ला केला. (Breaking Marathi News)
करणने निवृत्तीनाथच्या पायावर आधी बॅट मारला. बॅटचा फटका लागताच निवृत्तीनाथ खाली वाकला. त्यानंतर करणने दुसरा फटका मारला तो निवृत्तीच्या मानेवर लागला. मानेवर जोरदार फटका लागल्याने तो बेशुद्ध झाला.
उपस्थित मित्रांना त्याला तातडीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तिथे निवृत्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यानंतर निवृत्तीचा मित्र प्रसाद धरमसहारे याने घटनेची तक्रार अड्याळ पोलिसात दाखल केली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.