Bihar Reservation: आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवणार, नितीश कुमार यांची घोषणा

Bihar Reservation: आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज केली. यासंदर्भातील सविस्तर अहवाल नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत मांडला
Nitish Kumar
Nitish KumarSaam Digital
Published On

Bihar Reservation

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज केली. यासंदर्भातील सविस्तर अहवाल नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत मांडला. त्यांनी मांडलेला हा प्रताव मंजूर होण्यासाठी अजून बऱ्याच प्रक्रीयांमधून जावे लागणार आहे. मात्र, नितीश कुमार यांच्या या प्रस्तावामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावरून देशभरात चर्चांना उधाण आले आहे.

नितीश कुमार यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर विधानसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली. यावेळी आरक्षणाची व्याप्ती ५० वरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाचा समावेश करून ७५ टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवली जाऊ शकते यावर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावानुसार सध्या एससीसाठी असलेल्या १६ आरक्षणाची मर्यादा २० टक्के केली जाईल. एसटीचे आरक्षण १ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत वाढेल. तर ईबीसी आणि ओबीसी मिळून ४३ टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मागणीला बळ मिळणार?

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा हा कुणबीच आहे, त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नसल्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहे, असे मराठा समाजाचे म्हणणे आहे. त्यावरून मराठा समाज आणि राज्य सरकामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच नितीश कुमार यांनी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता आहे.

Nitish Kumar
Prahlad Patel Car Accident : केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर

विधानसभेत या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी महिलांवर केलेल्या विधानामुळे महिला आमदारांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे, मुली सुशिक्षित झाल्या तर लोकसंख्याही नियंत्रणात राहील, असे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे.

Nitish Kumar
Bharat Jodo Yatra : काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा-२' डिसेंबरपासून सुरू होणार? नियोजनात मोठा बदल होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com