Maharashtra Politics ajit pawar question Cm Eknath Shinde group attention to bjp role Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांच्या 'त्या' प्रश्नाने शिंदे गटात अस्वस्थता; नाराज आमदार भाजपकडे मोठी मागणी करणार

Ajit Pawar vs Eknath Shinde Group: अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न शिंदे गटातील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या तिखट प्रश्नामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar vs Eknath Shinde Group: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १६ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी याप्रकरणात एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केली. ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला.

त्यावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं. दोघांमध्ये या विषयावरून खडाजंगी होणार हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधस्थी केली. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही.

मात्र, अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न शिंदे गटातील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या तिखट प्रश्नामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येते.

विशेष बाब म्हणजे अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे.

त्यांचे कार्यकर्ते सातत्याने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत असल्याच्या तक्रारी सुद्धा शिंदे गटाने केल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. आता अजित पवार यांनी केलेल्या तिखट प्रश्नामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.

यावरून शिंदे गटातील काही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि पवार यांच्यात आणखी कटुता निर्माण झाल्यास भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT