Eknath Shinde: केईएम रुग्णालयाच्या ६ वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

CM Eknath Shinde visited KEM Hospital: केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.
Chief Minister Eknath Shinde visited KEM Hospital inquired of patients health
Chief Minister Eknath Shinde visited KEM Hospital inquired of patients health Saam TV
Published On

CM Eknath Shinde visited KEM Hospital: केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोमवारी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा केईएम रुग्णालयास अचानक भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. केईएम ९७ वर्षे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सुविधांचे अद्ययावत करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Chief Minister Eknath Shinde visited KEM Hospital inquired of patients health
Chandrayaan 3 update : ...तर 23 ऑगस्ट नाहीतर 27 ऑगस्टला चंद्रावर उतरेल चांद्रयान-3; इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी केईएम रुग्णालयास (Hospital) अचानक भेट देऊन थेट रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

विविध वार्ड आणि तेथील सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली. भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, रुग्णालयातील सहा वार्डचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Chief Minister Eknath Shinde visited KEM Hospital inquired of patients health
Maharashtra Politics News: शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थांबवा; आमदाराचा महाविकास आघाडीतील पक्षांना सल्ला

जेणेकरून याठिकाणी आणखी ४०० ते ४५० रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. काही रुग्णांनी आर्थिक अडचणीची माहिती दिली.त्यावर पैश्या्ंअभावी कुणाचेही उपचार थांबणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना दर्जेदार दूध पुरवण्यात यावे याबाबतही सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केईएम येत्या दोन-तीन वर्षात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णसेवा, येथील सुविधा आणखी आधुनिक करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान दिले. रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या उपचारांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com