Maharashtra Politics News: शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थांबवा; आमदाराचा महाविकास आघाडीतील पक्षांना सल्ला

Sharad Pawar Latest News: शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थांबवा; आमदाराचा महाविकास आघाडीतील पक्षांना सल्ला
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Sharad Pawar Latest News: काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीत मोठी फूट पाडत अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले होते. यानंतर शरद पवार हेही भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेला आणखी बळ मिळालं ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुण्यातील गुप्तच भेटीनंतर.

मात्र एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपण काही झालं तरी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होत. मात्र तरीही ते भविष्यात भाजपशी युती करू शकतात, अशी चर्चा अधूनमधून सुरु आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Kalyan Crime News: गणेशमूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, गरोदर पत्नीला धक्काबुक्की; कल्याणमधील घटना

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे म्हणाले आहेत की, शरद पवार यांच्याबाबत मित्र पक्षातील संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते पवार हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा करत आहेत. या विषयी स्वतः शरद पवार यांनी भाजप पक्षात कदापी जाणार नसल्याची आपली भूमिका स्पष्ट केली असून मित्र पक्षांनी कृपया यावर चर्चा करणे थांबवावे, असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप भेट झाली होती. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही भेट झाली होती. या या बैठकीला जयंत पाटील, हे देखील उपस्थित होते. यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Maharashtra Government Schemes: ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार

ते म्हणाले आहेत की, अजित पवार आणि शरद पवार यांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावे. आम्हाला त्याच्यात काहीही वेगळे वाटत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com