Pune Crime: पुणे शहर ड्रग्स माफियांच्या विळख्यात? कात्रजमधून १ कोटींचं अफीम जप्त; राजस्थानी टोळी अटकेत

Pune Crime News: शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Pune Police Seized 1 Crore Rupees narcotics 3 Accused arrested in Katraj Area
Pune Police Seized 1 Crore Rupees narcotics 3 Accused arrested in Katraj AreaSaam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Crime News: शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगच्या दहशतीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पोलिसांकडून या गँगच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच पुणे शहराला चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे.

एकीकडे नागरिकांवर होणारे हल्ले, दरोडे, घरफोडी, चोरी यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. यातच आता पुणे शहर (Pune Crime News) ड्रग्ज माफियाच्या विळख्यात सापडतंय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पुणे पोलिसांनी एका कारवाईत ड्रग्स माफियांच्या टोळीचा जेरबंद केले आहे.

Pune Police Seized 1 Crore Rupees narcotics 3 Accused arrested in Katraj Area
Power Block At Thane: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, ठाणे स्थानकात बुधवारी रात्री पॉवर ब्लॉक; रेल्वे वाहतुकीत मोठा बदल

पोलिसांनी (Pune Police) ड्रग्ज माफियांकडून १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ही टोळी राजस्थानची असल्याची माहिती आहे.कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ६४ लाख २८ हजार रुपये किमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफीम जप्त केले.

Pune Police Seized 1 Crore Rupees narcotics 3 Accused arrested in Katraj Area
Mumbai News: कुर्ल्यात कंपाउंडची भिंत कोसळली, १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, हे अफिम आपल्याला चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांनी दिल्याचे त्याने सांगितले. तसेच, या दोघांकडे अंमली पदार्थाचा मोठा साठा असल्याची माहितीही त्याने दिली.

दरम्यान, आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील गोकुळनगर भागातून चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत यांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. हे अमली पदार्थ नेमके कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com