Power Block At Thane: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, ठाणे स्थानकात बुधवारी रात्री पॉवर ब्लॉक; रेल्वे वाहतुकीत मोठा बदल

Special Power block On Thane station: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. बुधवारी रात्री ११.५५ पासून ठाणे स्थानकातील फलाट ६ आणि ७ वर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Special Power block On Thane station
Special Power block On Thane station Saam TV
Published On

Special Power Block on Thane Station:

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. बुधवारी रात्री ११.५५ पासून ठाणे स्थानकातील फलाट ६ आणि ७ वर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पादचारी पुलाचा ५ मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या काळात काही लोकल ट्रेन उशिराने (Mumbai Local Train) धावणार असून काही गाड्या रद्द देखील करण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यत हा पॉवब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Special Power block On Thane station
Eknath Shinde: केईएम रुग्णालयाच्या ६ वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि ५ व्या रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक (Special Power block) घेण्यात येणार आहे. या काळात लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुलाचा गर्डर टाकण्यासाठी १४० टनाच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. अप जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान मुंबईत येणाऱ्या हावडा -मुंबई एक्सप्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, चैन्नई- मुंबई एक्सप्रेस आणि पुडुचेरी -दादर एक्सप्रेस सहाव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

Special Power block On Thane station
Mumbai News: कुर्ल्यात कंपाउंडची भिंत कोसळली, १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. याशिवाय मुंबईतून जाणाऱ्या मुंबई-मडगाव , लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी तेजस एक्सप्रेस पाचव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटणारी १५ डब्बा कल्याण लोकल आणि कल्याणहुन रात्री ११.०५ वाजता सुटणारी सीएसएमटी १५ डब्बा लोकल रद्द करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com