uddhav thackeray and devendra fadnavis News Saam tv
मुंबई/पुणे

VIDEO : उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात 'मुसळधार' चर्चा, कोण काय म्हणालं?

uddhav thackeray and devendra fadnavis News : उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीवर सर्व राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिय दिल्या आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज म्हणजे गुरुवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. विधीमंडळातील लिफ्टने जाताना दोघांची भेट झाली. दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सर्वच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली. विधानभवन परिसरात लिफ्टसाठी वाट पाहताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

आजच उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्येही चर्चा झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट भेट दिलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विधानपरिसरातील भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र प्रवास केला. त्यावेळी कुणीही नव्हतं. यावर एक गाणं आहे. 'ना ना करते प्यार' याचा नाना पटोलेंशी संबंध नाही,अशी शाब्दिक कोटी ठाकरेंनी केली. तसेच ना करते प्यार, तुमसें कर बैठे असं आमच्यात काही नसून ती योगायोगाने भेट झाली. गुप्त भेटीसाठी लिफ्ट चांगलं ठिकाण आहे, अशी मिश्किल टिप्पणी ठाकरेंनी केली.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

दोघांच्या भेटीवर भाजप नेते सुधीन मुनगंटीवार म्हणाले, 'याचा राजकारणाशी संबंध नाही. याचं उत्तर माझ्याजवळ आहे. दोघे एकत्र येणार नाही. उद्धव ठाकरे आणि भाजपची युती कधीही होऊ शकत नाही'.

दोघांच्या भेटीवर अनिल परब काय म्हणाले?

राजकारणात कोणी कोणाचा फार काळ शत्रू असू शकत नाही. भाजपच्या नेत्यांनी केलेलं विधान ठाकरेंच्या नेत्यांनीही केलं आहे. दोघांच्या भेटीवर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, 'केवळ एका लिफ्टमधून अशा काही चर्चा होत नाही, तो फक्त योगायोग होता. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र येण्याला केवळ योगायोग म्हणतात. भविष्यात काय होईल, याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. कारण आम्हाला भविष्याबद्दल बोलता येत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT