Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

Mahayuti Government: विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली
Mahayuti Saam TV

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुढच्या महिन्यामध्ये विधानपरिषदेच्या (Vidhan Parishan Election 2024) ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये (Mahayuti) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये सरकारने दुसरीकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. विधानपरिषद निवडणूकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून (Maharashtra Government) हालचाली सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ४ जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १२ आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या होत्या.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली
Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार? कोणता मुद्दा गाजणार?

भाजपने सध्या आपले लक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या निवडीकडे वळवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती थांबवली होती. त्यानंतर राज्यपालनियुक्त १२ आमदारांचे प्रकरण कोर्टात गेले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. येत्या ४ जुलैला याप्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान महत्त्वाचा निर्णय होऊन १२ राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंघानेच भाजपने आतापासूनच हालचाली सुरु केल्या असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली
Maharashtra Rain: पुढील ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com