Sushma Andhare Criticized Gulabrao Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare Video: मी हवेत बोलत नाही... अजून पुरावे देते, सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना इशारा

Sushma Andhare Criticized Gulabrao Patil: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केला होता.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना काही कामं नाहीत, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. 'मी हवेत बोलत नाही. अजून पुरावे देते मी.', अशा शब्दात सुषमा अंधेरा यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना इशारा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केला होता. तेव्हापासून सुषमा अंधारे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत.

सुषमा अंधारे यांनी पुण्यात बोलताना गुलाबराव पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. शिक्षकांना पैसे वाटल्याच्या व्हिडीओवर बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 'मी आरोप नाही पुरावे सादर केले आहेत. दराडे यांच्या विजयासाठी गुलाबराव पाटील यांनी एक विधान केले की मतांसाठी आम्ही दरोडा टाकू. आता हा व्हिडीओ समोर आला आहे. मी तपशीलात जाऊन माहिती घेतली आहे. मी पुरावे दिले आहेत. इधर उधर की बात मत कर पैसे दिये है क्या उसपे बोल.' अशा शब्दात त्यांनी गुलाबराव पाटील यांना इशारा दिला. तसंच, 'अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली आहे. अनिल देसाई निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू करतील.', असे देखील त्यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 'धन्यवाद गुलाबराव. अजून पुरावे देते मी. मी हवेत बोलत नाही. व्हिडीओमधील जे लोकं आहेत ते सभेमध्ये होते आणि तेच लोकं पैसे देत आहेत. दराडे यांचे रेकॉर्ड तपासा.' उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे हारल्या तर मी राजीनामा देईल असे वक्तव्य केले होते. उदयनराजे यांच्या या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'उदयनराजे यांनी शब्द पाळला पाहिजे. चंद्रकांतदादा, आशिष शेलार यांनी सन्यास घ्यायचा होता तो शब्द पाळला नाही. उदयनराजे यांनी ते केलं पाहिजे. पंकजा मुंडे यांचा पराभव स्वीकारला पाहिजे. पंकजा मुंडे या ओबीसी सभेला जालनामध्ये का गेल्या नाहीत. त्यांच्या मनातील शैल्य अजून गेलेलं नाही की त्यांचा पराभव एका मराठा उमेदवाराने केले आहे.'

यावेळी सुषमा अंधारे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, 'व्यक्तिगत पातळीवर येऊ नये. मूळ मुद्दा बाजूला होऊ नये. राजकीय नेते यात स्वतःचे स्कोर सेटल करत नाहीत ना हे बघावं.' तसंच त्यांनी विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर टीका केली. 'शिवतारे मस्तीखोर आहेत हे दिसतंय. निवडणुका झाल्यावर या भाषांना काही उपयोग नाही. तुम्ही होतात मग माघार का घेतली? कार्यकर्ते तोंडघशी पडले.', अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT