Sushma Andhare: 'जळगावमध्ये CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप', सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप; व्हिडिओही ट्विट केला!
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: Saam Tv

Sushma Andhare: 'जळगावमध्ये CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप', सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप; VIDEO केला शेअर

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून काल त्यांनी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. यावेळी पैसे वाटण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून काल त्यांनी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. अशातच मुख्यमंत्री शिंदेच्या जळगावमधील बैठकांनंतर पैसे वाटप झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

काय म्हणाल्यात सुषमा अंंधारे?

"महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले," असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच अंधारेंनी एक व्हिडिओ देखील ट्वीट केला असून कुठाय निवडणूक आयोग? असा सवाल उपस्थित केला आहे.

यावरुनच खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "सुषमा अंधारे यांनी त्याबाबतचा व्हिडीओ दिला. हा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पदवीधर शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. लोकशाहीची हत्या होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पाहत आहे," असा टोला त्यांनी लगावला.

Sushma Andhare: 'जळगावमध्ये CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप', सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप; व्हिडिओही ट्विट केला!
Maharashtra Politics : विधानसभेत भाजप तब्बल १७० जागा लढवणार? शिंदे-पवार गटाची धाकधूक वाढली, पाहा VIDEO

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सुषमा अंधारे यांना काही काम नाही. पोलिंग एजेंटला याद्या द्यायच्या असतात. त्या याद्यांबरोबर पैसे ही दिले जातात. यादी बरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे आणि सर्वांना ही माहितीच आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Sushma Andhare: 'जळगावमध्ये CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप', सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप; व्हिडिओही ट्विट केला!
Buldhana Crime: ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्ला! चाकूने वार, डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने लुटण्याचा प्रयत्न; बुलढाणा हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com