Pune Bus Accident: महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

Rajgurunagar-Pune MSRTC Bus Hit Pedestrian: पुणे-नगर महामार्ग ओलांडतांना एका पदचारी व्यक्तीला बसने उडवल्याची घटना घडलीय. या अपघातात पदचारी व्यक्तीचा मृत्यू झालाय.
Pune Bus Accident: महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Rajgurunagar-Pune MSRTC Bus Hit Pedestrian

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे-नगर महामार्गावर बसने पदचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली. या बसच्या धडकेत पदचारी व्यक्तीचा मृत्यू झालाय. ही बस राजगुरुनगरहून पैठणकडे जात होती. दरम्यान अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं वय ४१ असून त्याची अजून ओळख पटलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, पादचारी पुणे-नगर महामार्ग ओलांडत होता. त्याचवेळी राजगुरुनगर ते पैठण ही बस नगरच्या दिशेने जात होती. पदचारी अचानक बससमोर आल्याने चालकाला बस नियंत्रणात आणता आली नाही आणि बसची पदचाऱ्याला धडक बसली. धडक बसल्यानंतर पदचारी खाली पडला आणि बसच्या मागील चाकाखाली आला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्यानंतर बस चालक तेथून पळून जात त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं.

अपघाताची माहिती कळताच लोणीकंद पोलीस आणि लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृत व्यक्तीला ससून रुग्णालयात हलवून बस रस्त्यातून हटविली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे सोलापूर रस्त्यावर बसचा अपघात

पुणे सोलापूर रस्त्यावर यवत जवळ एसटी बसचा अपघात होऊन जवळपास ३० लोक जखमी झालेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील यवत जवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला‌. अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलय.

Pune Bus Accident: महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Pune Accident VIDEO: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com