Sunetra Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

sunetra pawar flight technical glitch: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्या दिल्लीला बैठकीसाठी जाणार होत्या त्यापूर्वीच ही घटना घडली.

Priya More
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

  • मुंबई विमानतळावरून त्या दिल्लीला रवाना होणार होत्या

  • सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे उड्डाण काही काळ थांबवण्यात आले

  • दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी जाताना त्यांना २ तास उशीर झाला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्या मुंबईवरून दिल्लीला बैठकीसाठी निघाल्या होत्या. दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच मुंबई विमानतळावर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्या सीएमआर या खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास करत होत्या. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर पाऊण तास वाट पाहत राहावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ९ जून रोजी मुंबईवरून दिल्लीला एनडीएच्या महत्वाच्या बैठकीला जाणार होत्या. या बैठकीला त्या खासगी विमानाने जाणार होत्या. त्यांनी सीएमआर कंपनीचे विमान बुक केले होते. ठरल्याप्रमाणे त्या दिल्लीला जाण्यासाठी सायंकाळी ५ वाजता निघाल्या. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे त्यांना कळाले. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून या विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. बराच तास त्यांना विमानतळावर वाट पहावत राहावे लागले. दोन तासांनंतर म्हणजे संध्याकाळी ७ वाजता त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पोहण्यासाठी २ तास उशिर झाला. सुनेत्रा पवार यांच्यासोबत या विमानातून पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे नेते देखील प्रवास करणार होते. हे सर्वजण दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये सहभागी होणार होते. पण विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या सर्व नेत्यांना दिल्लीत पोहचण्यासाठी उशिर झाला.

या घटनेमुळे राजकीय नेत्यांच्या विमान प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही महिन्यापूर्वी विमान अपघातात निधन झाले होते. ते बारामती दौऱ्यावर निघाले होते. बारामतीमध्ये त्यांच्या ४ सभा होणार होत्या. बारामतीमध्ये पोहचण्यापूर्वीच त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ४ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा सध्या तपास सुरू आहे. या विमान अपघातानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी, पुढचे १० दिवस पाणी पुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणार फटका?

Maharashtra News Live Update: गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकलेला नाही- गिरीष महाजन

FIFA World Cup Trophy: क्रिकेटच्या ट्रॉफीपेक्षा फिफाच्या वर्ल्डकपची ट्रॉफी का आहे इतकी महाग?

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार?

टॉयलेट आणि वॉशरूममध्ये फरक काय? दोन्ही एकच की वेगवेगळे?

SCROLL FOR NEXT