अजितदादांची जागा वहिनी घेत आहेत. २०२९ मध्ये वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, असं विधान जय पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलं आहे. माझ्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत अलीकडेच चर्चा झाली. अजितदादांना एकदा मुख्यमंत्री होताना बघायची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता वहिनी पण खूप कष्ट घेत आहेत. मला वाटतं की २०२९ मध्ये वहिनीच निवडणुकीला उभ्या राहतील आणि ती जागा मुख्यमंत्री म्हणून वहिनींनीच घ्यायला हवी, असे आम्हाला सगळ्यांना वाटते, असे जय पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा म्हणजेच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता राज्यसभेची जागा रिक्त झाली असून, तिथे कुणाची वर्णी लागते, याबाबत चर्चा सुरू आहेत. याबद्दल जय पवार यांना विचारणा केली. त्यावर मुंबईत काय घडामोडी काय सुरू आहेत याबद्दल माहिती नाही. मी मुंबईत जाणार आहे. मला याबाबत काही माहिती मिळाल्यानंतर मी सांगेल, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.