Mahayuti News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजित पवारांच्या खात्यावर एकनाथ शिंदेंचा डोळा; दिल्लीतील बैठकीत नेमकं काय ठरलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Political News : सत्ता स्थापनेचं घोड नेमकं कुठं अडलंय... हे स्पष्ट होणं बाकी आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं नाही. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं गृहखातं आणि अर्थखात्यावरुन फडणवीस आणि अजितदादांना डिवचलंय. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Vishal Gangurde

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यावरही महायुतीचं सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे. महायुतीतला बेबनाव या निमित्तानं समोर आलाय. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदे सेनेनं फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असले तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असावे, हा नैसर्गिक नियम आहे.गृहखात्यावर एखादा डॅशिंग नेता असायला पाहिजे, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केले.

शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे गृहखाते शिवसेनेला मिळण्याबाबत अजूनही ठाम असल्याचे संकेत मिळत आहे. इतकच नाही तर अर्थखात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असं शिरसाट यांनी म्हटलंय.

महायुतीतही अजित पवारांची कोंडी केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते, असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले होते. कारण दादांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कामांना मंजुरी दिली नव्हती. हाच राग विजयानंतरही शमला नाही असं चित्र आहे. कारण शिंदे सेनेनं अर्थखात्याबाबतही टिप्पणी केली. या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असे म्हटलंय.

अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे सगळ्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. साताऱ्यातील आपल्या गावी गेले. त्यामुळे महायुतीच्या खातेवाटपाची बैठक लांबवणीवर पडली आहे. अशातच आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा गृहखातंच नव्हे तर अजितदादांच्या अर्थखात्यावरही डोळा असल्याचं पुढं आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT