नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. महायुतीच्या जागावाटपावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानी चर्चा सुरु आहे. या चर्चेत महायुतीतील वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने आतापर्यंत ९९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिंदे गटाने आतापर्यंत ४५ उमेदवार जाहीर केल्याची माहिती आहे. तर अजित पवार गटाने ३८ उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीचा २८८ जागांवर अद्याप तोडगा निघाला नव्हता. यासाठी महायुतीमधील वरिष्ठ नेते दिल्लीला पोहोचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. तीन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली. तीन तासांनतर महायुतीची बैठक संपली.
महायुतीच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेतील वादाच्या जागांपैकी वसई-विरार, पालघर आणि भोईसर या तीन जागा सोडण्यास भाजपने तयारी केली आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजप लढणार आहे. पालघर, भोईसर, वसई विरार, नालासोपारा हे वादग्रस्त मतदारसंघ असून त्यावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नालासोपाऱ्यामध्ये भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, त्याला शिंदे गटाचा विरोध होता. तो उमेदवार मागे घ्यावी, ही मागणी शिंदे गटाची होती. मात्र आजच्या बैठकीत तो उमेदवार भाजपचाच राहील यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा यशस्वी झाली आहे. वादविवाद न होता खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा झाली. निवडणूक मेरिट हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. ज्या जागांबाबत संशय आहे, तिथे जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन निर्णय होणार आहे. दिल्लीत चर्चा आता पूर्ण झाली असून माराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होईल. जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युलाची घोषणा महाराष्ट्रात लवकरच होईल, अशी माहिती हाती आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.