Ganesh Naik Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Ganesh Naik VIDEO: सिडको आणि शासनात बिल्डरांचे दलाल, भूखंड हस्तांतरावरून गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर

Ganesh Naik Aggressive In Vidhansabha: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेस भूखंड हस्तांतरित होत नसल्याबाबत गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी ते सभागृहामध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Priya More

सुनिल काळे, मुंबई

नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) संतप्त झाले आहेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. परिणामी सभागृहात एकच गोंधळ उडाला.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेस भूखंड हस्तांतरित होत नसल्याबाबत गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी गणेश नाईक सभागृहामध्ये खूपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उत्तर देताना सरकारकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक म्हणत असलेल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४० स्केअर किलोमीटरचा भूखंड पालिकेकडेच राहील अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं.

पण गणेश नाईक यांचा रुद्रावतार पाहून आणि त्रागा पाहून सत्ताधारी पक्षातले सदस्य सुद्धा अवाक झाल्याचे पाहायला मिळाले. याचाच धागा पकडून विरोधी पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांनी केलेले आरोप गंभीर असल्याचे सांगत भ्रष्टाचार सरकारच्या पातळी सुरू आहे का? असं म्हणत वातावरण तापवायचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या वादात ठाण्यातल्या राजकारणाची किनार असल्याची चर्चा आहे.

नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुंबईमध्ये दबदबा आहे. त्या पार्श्वभूमीवरती गणेश नाईकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच गणेश नाईकांच्या ताब्यात असलेल्या नवी मुंबईच्या निर्णयासंदर्भात चालढकल केली जात असल्याचे गणेश नाईक यांचं म्हणणं असल्याचे या एकूणच यांच्या विधानावरून दिसून येते. परिणामी कालचा सामना हा भाजपचे नेते विरुद्ध मुख्यमंत्र्यांचे खातं असा रंगल्याचं सभागृहात चित्र दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT