Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बनणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

Rahul Gandhi In Pandharpur Wari : INDIA आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीत यंदा वारकरी म्हणून राहुल गांधी सहभागी होणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam Digital

वैदेही काणेकर, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत सर्रास कामगिरी केलेले विरोधक म्हणजेच INDIA आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीत यंदा वारकरी म्हणून राहुल गांधी सहभागी होणार आहेत. १४ जुलै ला राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतील. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील या वारी सहभागामुळे आगामी विधानसभेच्या प्रचारालाही वेग येईल असा म्हटलं जात आहे . मात्र गांधी यांच्या याच वारी सहभागामुळे महायुती अलर्ट मोड वर दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत NDA सरकारचा अपेक्षा भंग केल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि INDIA आघाडीत बळ संचारल्याचा दिसून येत आहे . यातच विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी संसदेत आक्रमक पावित्र्यात दिसून आले आहे. ज्या ज्या धार्मिक आणि सनातनी मुद्द्यांवरून राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या त्या मुद्याना हाती घेऊन आता राहुल गांधी मैदानात उतरताना दिसून येत आहे. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी काही मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली होती. आता संसदेत भगवान शंकरांचा फोटो हाती घेऊन हिंदुत्वाबाबत विधाने राहुल गांधी यांनी केली. यातच हिंदुत्वाच्या विधानावरून राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रचंड प्रयत्न हा देखील करण्यात आला. मात्र ही बाब ताजी असतानाच महाराष्ट्रातील ऐतिहासिक पंढरीच्या वारीमध्ये सामान्य वारकरी म्हणून राहुल गांधी सहभागी होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याबाबत महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या खासदार प्रणिती शंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्र देऊन राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्यास आग्रही भूमिका घेतली. यावर आता महाराष्ट्रात राजकारण तापल आहे. राहुल गांधी यांच्या वारीतील सहभागावर महायुती तर्फे तिखट प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

Rahul Gandhi
Kolhapur News : विजेचा धक्का लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; कोल्हापुरात शेतात काम करताना दुर्घटना

"विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान केला आहे . हिंदू हा संयमी आणि सहिष्णू आहे . याचे सडेतोस उत्तर हिंदू राहुल गांधी यांना देतील, अस एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

"हिंदूंना हिंसक बोलणाऱ्या आणि हिंदूंविषयी सतत घृणा बाळगणाऱ्या राहुल गांधी यांना वारीवारी चे आमंत्रण देण्याचा मौलाना शरद पवार यांना काय अधिकार आहे? याच शरद पवार यांच्या गावातून तुकाराम महाराजांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. मात्र वारीकडे शरद पवार यांची पावले कधीच वळली नाही. मग कोणत्या तोंडाने ते राहुल गांधी याना आमंत्रण द्यायला गेले . इतकी वर्षे वारी दिसली नाही आणि आज वारीत यायला धडपडत आहेत. महाराष्ट्राचा जनतेला माहित आहे कि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे चुनावी वारकरी होत आहे, असा आरोप भाजपचे वारकरी संप्रदाय नेता, आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.

लोकसभेत विजय थोडक्यासाठी हुकलेल्या INDIA आघाडीतील नेते आता राज्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष देऊन आहेत. महाराष्ट्रात येत्या ऑटोबर महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत. महाराष्ट्रात आघाडीसाठीचे पूरक वातावरण लोकसभेत दिसून आले. मात्र हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी यांचा आगामी वार हा वारकरी म्हणून तर नाही ना, हीच चर्चा रंगली आहे.

Rahul Gandhi
Kolhapur News : विजेचा धक्का लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; कोल्हापुरात शेतात काम करताना दुर्घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com