Kolhapur News
Kolhapur News Saam Digital

Kolhapur News : विजेचा धक्का लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; कोल्हापुरात शेतात काम करताना दुर्घटना

Kolhapur Accident News : कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावात विजेचा धक्का लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना ही दुर्घटना घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.
Published on

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करताना वीजेचा धक्का बसून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा पाटील (वय 39) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय 36) अशी या दोघांची नावं असून या दुर्घटनेने कोपर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

Kolhapur News
VIDEO: लाडकी बहीण योजनेसाठी आता घरबसल्या भरता येणार फॉर्म; कोणत्या अॅपवर आणि कसा कराल अर्ज?

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील मौजे कोपार्डे गावात आज सायंकाळी 4 च्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शिवारात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना चुकून विद्युत खांबाला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. मृतदेह पोस्टमार्टसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Kolhapur News
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना 'ओबीसीं'कडून नाही तर कोणाकडून धोका?; ओबीसी नेत्यांच्या विधानाने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com