आतली बातमी, पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांची खलबतं; बैठकीत उद्धव ठाकरेंनी  काय सांगितलं?
Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: आतली बातमी, पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांची खलबतं; बैठकीत उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं?

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या गुरुवारीपासून सुरु होणार आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी ठाकरे गटाने एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. ठाकरे गटाने मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आमदारांची मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय सूचना दिल्या?

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्या. विधीमंडळात उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आमदारांना पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सचूना ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. या बैठकीत ड्रग्ज, होर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरुन सरकारला घेरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुमच्यासाठी मी स्वत: अधिवेशनात उपस्थित राहील, अशीही ग्वाही उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिली. शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारा, असेही ठाकरेंनी आमदारांना सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाच्या बैठकीत कोणते नेते उपस्थित होते?

उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे

संजय राऊत

सचिन अहिर

उदयसिंग राजपूत

नितीन देशमुख

सुनील प्रभू

ऋतुजा लटके

अजय चौधरी

कैलास पाटील

अंबादास दानवे

अनिल परब

विलास पोतनीस

वैभव नाईक

प्रकाश फातर्फेकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

VIDEO: पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, मंत्री भुसेंना पीक विमा केंद्र चालकांचा पुळका? विरोधकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT